face hair banner

त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत!

केसांची आणि त्वचेची काळजी घेताना, घरगुती उपायांसोबत खास ब्युटीपार्लर ट्रिटमेंट घेणेही फायदेशीर ठरते. मात्र, या
ट्रिटमेंट्सचा परिणाम मर्यादित असल्याने वरचेवर पार्लरच्या वा-या करव्या लागतात. पण, केस मूळापासून मजबूत व
त्वचेला आतून तजेलदार बनवायचे असेल, तर आहारात योग्य त्या जिन्नसांचा समावेश करायला हवा. केसाचे व त्वचेचे
आरोग्य जपणारे पोषक घटक नियमित पोटात जायला हवेत. यासाठी, मैत्री करायला हवी पुढील पदार्थांशी!
1. पालक – ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण असणारे पालक ही बारमाही भाजी खाण्याने त्वचेवर अकाली पडणा-
या सुरकुत्यांपासून बचाव होतो आणि प्रदुषित हवेमुळे केस कमकुवत होतात, ते मधूनच तुटतात. अशा
समस्यांवरही आराम मिळतो.
2. जवसाच्या बिया – त्वचेवरील ऍलर्जीसारख्या समस्या दूर होऊन, काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार दिसण्यास
मदत होते. जवसाच्या बियांमधील ‘ओमेगा–३’ त्वचा नितळ करते.
3. अॅवॅकॅडो – ब-याचशा शॅम्पूमध्ये अॅवॅकॅडो फळ वापरण्यामागील महत्त्वाचे, कारण हेच आहे की हे
फळातील जीनसत्त्वे केस, त्वचा व नखांसाठी उपयुक्त आहेत. या फळाचे नियमित सेवन केल्यास
त्वचा किंवा केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.
4. अंड – त्वचेवरील तजेला व केसांची मजबूती टिकवून ठेवायची, तर अंड्याला पर्याय नाही. अंड्यातील प्रोटिन,
व्हिटॅमिन, फॅटी एसिड्स, एन्टी ऑक्सिडंट त्वचा तसेच केसांसाठी उपयुक्त ठरतात.
5. भोपळ्याच्या बिया – या बियांमधील झिंकमुळे त्वचापेशी निर्माण होण्यास मदत होते. बियांच्या सेवनाने
त्वचेचा रंगही उजळतो. तेलकटपणाची समस्येवरही आराम मिळतो. तसेच, यातील ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

वरील, पाच जिन्नसांचे नियमित सेवन करा. त्वचा व केसांची निगा राखण्यात हे पदार्थ मोलाचे काम करतात. कुठलाही
तात्पुरता आकर्षकपणा न देता ख-या अर्थाने आरोग्यदायी सौंदर्य बहाल करतात.

More Articles
Designed and Developed by SocioSquares