WATER (1)

त्वचेची अशी काळजी घेताय ना?

प्रचंड उकाड्यातून पावसाळ्याने आपली सुटका तर केली, मात्र बदललेल्या वातावरणामुळे चेह-याची जरा अधिक काळजी घ्यावी लागेल. थंडावा व हवेतील दमटपणामुळे त्वचेचा व केसांचा पोत खराब होतो. त्वचा कोरडी व निस्तेज होऊन, वात व पित्तासारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी शरीराची आंतर्बाह्य काळजी घ्यावी लागते, यासाठी पोषक अन्न व योग्य जीवनसत्त्वांचे सेवन करणे आवश्यक असते. षौष्टिक व अचूक आहार त्वचा तजेलदार ठेवतो. यंदाच्या पावसाळ्यात खालील टिप्स लक्षाच ठेवाच!

१. केसांना तेलाने दररोज मॉलिश करावे.

२. अंघोळीपूर्वी मध व दह्याचे मिश्रण त्वचेवर लावावे.

३. अंघोळीसाठी साबणाऐवजी चणाडाळीचा वापर करावा व शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ करावी.

४. तूप व ऑलिव्ह ऑईल या सिन्ग्ध पदार्थांना आहारात स्थान द्यावे.

५. भरपूर प्रमाणात गोड व रसपूर्ण फळे खावीत.

६. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे, फ्रीजमधील गार पाण्याऐवजी कोमट किंवा साधे पाणी प्यावे.

७. कॉफी, शीतपेये, साखर, चॉकलेट, स्टॉल्स किंवा हॉटेलमधील खाणे व जंक फूडचे प्रकार टाळणे हिताचे ठरेल.

८. त्याऐवजी, सुकामेवा, तीळ, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन ऑईल, सर्व प्रकारची धान्ये हलके असे पचण्यास हलके असणारे अन्न सेवन करावे.

९. दूध, पपया, मध यांची पेस्ट बनवून चेह-यावर लावावी व पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.

१०. दोन चमचे मधात कडुनिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून तयार झालेला फेसपॅक चेह-यावर लावावा व फेसपॅक सुकण्यापूर्वी धुवून टाकावा.

११. पित्ताचा त्रास असणा-यांची त्वचा मुख्यत्वे तेलकट असते, अशा व्यक्तिंनी उष्ण अन्नपदार्थ खाऊ नयेत.

या उपायांसोबत अतिश्रम करणे टाळा, हवेतील आर्द्रतेपासून स्वत:चा बचाव करुन स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. वरील टिप्सच्या मदतीने त्वचेची किंवा केसांची काळजी न करता पावसात मनसोक्त भिजता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares