Makeup (1)

थंडीत कोरड्या त्वचेवर घरगुती उपाय!

आहारापासून पेहरावापर्यंत प्रत्येक बाबतींत ऋतूनुसार भिन्नता आढळते. वातावरणात होणा-या या बदलांमुळे शरीर आंतर्बाह्य परिणामांना सामोरे जाते. मुख्यत्वे, हिवाळ्यात त्वचेचा पोत फार बिघडतो. ती कोरडी होते, काळवंडते, पापुद्रे निघतात. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठीच काही उपयुक्त टिप्स, आजमावून पाहाच….

  1. गरमीच्या दिवसांत आपण आवर्जून सतत पाणी पितो आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतो. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे घाम फार येत नाही. थकवा जाणवत नाही. त्यामुळे कमी पाणी प्यायले जाते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज व कोरडी होते. यावर उपाय म्हणून आठवणीने थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहावे.
  2. सतेज त्वचा आहारावर अवलंबून असल्याने, स्निग्ध पदार्थ, सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या, शहाळ्याचे पाणी व भरपूर फलाहार घेत रहावा.
  3. पिकलेल्या पपईचा गर चेह-यास लावल्याने त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल. तसेच, एरंडेल तेलात व लिंबाच्या रसाच्या समप्रमाणातील मिश्रणाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा उजळ व टवटवीत रहाते.
  4. मुख्यत्वे अंघोळीनंतर हातापायाची त्वचा कोरडी होऊन खाज येते. त्यासाठी कुठलेही रेडीमेड क्रिम वापरण्यापेक्षा थोडेसे लोणी, साय, तूप किंवा तिळाचे तेल त्वचेववर चोळावे. यामुळे त्वचा कोरडी होत नाही, तिच्यातील तजेला टिकून रहातो.
  5. अधिक वेदनादायी ठरतात, त्या टाचेला पडणा-या भेगा. रोज अंघोळीनंतर मोहरीच्या तेलाते थोडी हळद मिसळून या भेगांवर लावावी, या उपायाने दुखणे कमी होते व भेगाही हळुहळू भरुन येतात.

अशाप्रकारचे, घरगुती उपाय कायम सरस ठरतात. कारण, घरच्या किचनमधील उपलब्ध जिन्नसांच्या वापरातूनच ते झटपट बनवता येतात. थंडीच्या दिवसांत त्वचेचे स्वास्थ्य जपणा-या आणखी काही रामबाण युक्त्या तुम्हाला ठाऊक असतील, तर नक्की लिहा खालील comment box मध्ये,

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares