SHOPPING BANNER

दिवाळी शॉपिंग सेल…

सण सोहळे आले की शॉपिंगसाठी एक हक्काचं निमित्त मिळतं. सर्वत्र ऑफर्स आणि सेल्सचा ओघ सुरु होतो. विक्रेते जास्तीतजास्त भन्नाट ऑफर्स देऊन गि-हाईकांना खूष करतात. कमी दरात भरपूर शॉपिंग करण्याचा फंडा आजमवायचा असेल, तर पुढील गोष्टींवर लक्ष ठेवा.

न्यूजपेपर

पहिल्या पानावरील पानभर जाहिराती सहज नजरेस पडतात. मात्र, काही लहान सहान जाहिरातींकडे मात्र दुर्लक्ष होते. न्यूजपेपरमध्ये खास तुमच्या परिसराची माहिती असलेल्या विभागात तुम्हाला जवळील दुकांनाची किंवा नव्या एक्सिबिशन्स माहिती मिळेल. तसेच, काही पेपर्समधून जाहिरांतीचे पॅम्प्लेट्स घरपोच येतात.

फॅशन मॅगझिन

फॅशन विश्वाची माहिती देणारी मॅगझिन्स खास सणानिमित्त सीझनल कॉपी काढतात. ज्यामध्ये सध्याचे ट्रेंडी कलर्स, डीझाईन्स, स्टाईल अशी तंतोतंत माहिती मिळू शकते. मेकअपच्या किटमधील लहानश्या वस्तूपासून सॅण्डल्सपर्यंत, फॅशनशी संबंधीत नव्या बाबी इथे नक्की वाचायला मिळतील. जेणेकरुन शॉपिंगला गेल्यावर गोंधळून न जाता, अचूक वस्तूची निवड कराल.

बॅनर्स

नजर जाईल तिथे जाहिरात दिसते. लहोन मोठ्या रस्त्यांवर, हायवेच्या दुतर्फा, प्लॅटफॉर्मवर, कुठले ना कुठले जाहिरातीचे बॅनर नजरेसमोर असतेच. तुम्ही एखादी वस्तू घेण्याच्या विचारात असाल व नेमकी त्यावरच छान ऑफर सुरु असेल, तर नक्कीच याचा फायदा होऊ शकेल. तेव्हा नीट लक्ष ठेवा.

सोशल साईट्सवरील नोटिफीकेशन्स

वर्षभर तुम्ही सोशल मिडिआवर एक्टिव्ह असाल किंवा नसाल, पण सणासुदीच्या दिवसांत या सोशल साईट्सना जरा भेट देत रहा. विविध ब्रॅण्ड्सच्या नोटिफिकेशन्स चुकवू नका. त्यामधून ट्रेंडी फॅशनचा शोध लागू शकतो. जो शॉपिंग करताना फायदेशीर ठरेल. तसेच, मोबाईलवर येणार मेसेज किंवा ईमेलर्स वरचेवर तपासत रहा. जेणेकरुन नवे कलेक्शन हुकणार नाही.

अशाप्रकारे, पूर्वतयारी करुनच शॉपिंगला जा. कष्टाने कमवलेले पैसे वाचवण्यासाठी जरा किंमतीत घासघीस करणे काही चुकीचे नाही. तिही एक कलाच आहे. म्हणून भाव करण्यात तरबेज असणा-या व्यक्तिला शॉपिंगला सोबत न्या. मस्त आणि स्वस्त अशी शॉपिंग करत दिवाळीच्या स्वागतासाठी नटून सजून तयार रहा बरं..!

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares