holi

धुळवड स्पेशल रेसिपी!

होळीचा सण म्हणजे, घरोघरी पुरणपोळी तर बनली असेलच. यंदा त्यासोबत आणखी काही गोडाचे पदार्थ बनवू. खालील रेसिपीज् नक्की करुन पहा आणि करोना व्हायरसमुळे यावेळी रंगांची उधळण करण्याला दिलेला विराम साजरा करु स्वादिष्ट पदार्थांच्या साथीने! 

मालपुआ रेसिपी 

साहित्य : १ कप साय काढलेलं दूध, ५० ग्रॅ. पनीर, २ मोठे चमचे गव्हाचे कणीक, १ मोठा चमचा रवा, १/२ चमचा वेलची पूड, तेल, १ कप साखर, १ कप पाणी, केशर. 

पाककृती : प्रथम दूध नीट उकळवून आटवून घ्या. दूध घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं पनीर टाका व मिश्रण पुन्हा ढवळून घ्या. हे मिश्रण आता रुम टेम्परेचरला येऊ द्या. १ कप साखरेतील दोन मोठे चमचे बाजूला काढा व उरलेल्या साखरेचा पाक करुन घ्या. या पाकात थोड्या केशरच्या काड्या टाका. हा पाक तयार करुन बाजूला ठेवा. 

आता, दूध पनीरच्या मिश्रणात कणीक, रवा, वेलची पूड व उरलेली साखर मिसळा. गरज वाटल्यास थोडंस दूधही घाला. मिश्रण घट्टसर हवं. 

आता, पॅन किंवा कढईमध्ये पुरेसं तेल गरम करुन पळीभर मिश्रण पॅनकेकसारखं पसरवा. मध्यम आचेवर मालपुआ शिजू द्या. नंतर, मालपुआ टिपकागदावर काढून घ्या. अतिरिक्त तेल बाजूला झाले, की त्यावर थोडा साखरेचा पाक पसरवा व गरमागरम सर्व्ह करा. 

चवीला झक्कास असा, मालपुआ बनवल्यानंतर! Comment द्वारे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा पटपट आणि तुमच्याजवळ असेच काही होळी स्पेशल पदार्थ आज तुम्ही बनवले असतील, तर पदार्थाच्या फोटोसहित ते मेसेज करा आम्हाला! 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares