new year banner

नववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’!

डिसेंबर!! वर्षसरतानाच्या उत्साहाने भारलेला हा महिना! या महिन्यात आपण असे काही नववर्ष संकल्प मनी धरतो, की
जर प्रत्येक संकल्प पूर्ण झाला, तर वर्षाअंती आपल्याइतकं परफेक्ट कुणीच नसेल. वर्षाचा पहिला महिना काटेकोरपणे
संकल्प पाळतोही, मग फेब्रु, मार्चपर्यंत हाच निश्चय थोडा फिका पडतो. पुढच्या महिन्यांत संकल्पांचा जोर आणखी कमी
होतो आणि व्यस्त दिनक्रमात सारंच मागे पडतं. असं काही येत्या २०१८ ला होऊ नये म्हणून, काही छोटे छोटे अगदी
सोप्पे संकल्प मनी धरुया!! पाहा वाचून हे कल्पक संकल्प तुम्हाला आवडतायेत का?
1. रस्त्याच्या डाव्याबाजूने चालू!

 
2. सिंग्नलवर बाकी कुणी थांबो न थांबो, आपल्यापासून सुरुवात करु. सिंग्नल पाळण्याचा पण करु!

 
3. महिन्यातून निदान एकतरी झाड लावू. लहानशा गॅलरीत किमान चार रोपे तरी लावण्याचा अट्टहास धरु.

 
4. कमी अंतरावर स्कूटी किंवा कारने न जाता, धडधाकट पायांना कामाला लावूया. त्यानिमित्ताने थोडं चालणंही
होईल!

 
5. सुट्टीच्या दिवशी तास दोन तास सायकलची वारी करुन, वर्षाअंती झीरो फिगर नाही, पण शोभेलसी शरीरयष्टी
बनविण्याचा प्रयत्न करु.

 
6. ट्रेनमधून प्रवास करताना कमीतकमी भांडणं आणि अधिकाधिक शांततेत प्रवास करता येईल, ते पाहू! यासाठी
धक्काबुक्कीतही थोडसं मौन पाळावं लागेल.

 
7. वर्षाच्या सुरुवातीला फक्त महिनाभर जीमला न जाता, वर्षभर जीमला जाण्याचा निश्चय करु.

 
8. डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळू. म्हणजे, गेल्यावर्षीपेक्षा यंदा डॉक्टरच्या कमी वा-या होतील, पैसेही
वाचतील.

 
9. दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसण्याचा लागलेला नाद कमी करण्यासाठी, अधिकाधिक पुस्तके वाचून
काढण्याचा सपाटा लावू, छानसे छंद जोपासू.

 
10. निदान संध्याकाळचे जेवण, तरी कुटुंबासोबत एकत्र घेऊ.

 
11. मुलांना मारुन मुटकून शिस्त लावण्यापेक्षा समजावून सांगण्यावर भर देऊ.

 
12. फास्ट फूड कमी करुन, होम फूड खाण्यावर भर देऊ.

 
13. शॉपिंग करण्याचं व्यसन लागलं असेल, तर यंदाच्या वर्षी शॉपिंग करण्यावर थोडं नियंत्रण ठेवून, त्या पैशातून
दुसरी एखादी गरजेची वस्तू घेता येईल.

 
14. चेह-याच्या ठेवणीतील तोचतोचपणा बाजूला सारायचा, तर मेक ओव्हरचा विचार करता येईल. नवा हेअर कट
किंवा कपड्यांची नवी स्टाईल येत्यावर्षी ट्राय करायला हवी.

 
15. सिगरेट, दारू सुटता न सुटणारी, पण तरी गेल्यावर्षीपेक्षा निदान प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न यंदाच्या वर्षी
नक्कीच करता येईल.

 
16. अधिकाधिक नव्या व्यक्तिंना भेटून, मित्रमंडळींचे कुटुंब मोठ्ठाले करुया. टेक्नोलॉजीचा आधार न घेता समोरासमोर
बसून मौखिक गप्पा मारण्यावर भर देऊया.

 
मैत्रिणींनो, या हलक्या फुलक्या नववर्ष संकल्पांतून तुम्हाला हवे ते निवडा. संकल्प पूर्ण करण्याचे कुठलेही दडपण न
घेता, फक्त स्वआनंदासाठी ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. येते नवे वर्ष तुम्हास सुखाचे व आरोग्यदायी जावो याच
सदिच्छा!! कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये,

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares