maharashtra din website

नामकरण ‘महाराष्ट्र’ राज्याचं!

प्रत्येकाला स्वत:च्या नावाबद्दल फार उत्सुकता असते. त्याचा अर्थ काय?, ते कुणी ठेवले?, आणखी कुठल्या नावांचे पर्याय होते? अशी ‘स्व’नावामागील कथा जाणून घ्यायची असते. विख्यात तत्त्ववेत्ता शेक्सपिअरने, “नावात काय आहे?” असे म्हटले असले तरी नावाभोवती कायमच अनेक प्रश्न फेर धरतात. गाव, शहर, राज्य किंवा जगभारातील देश प्रत्येकाच्या नामकरणाची स्वतंत्र्य कथा आहे. लढवय्यांचं राज्य म्हणून ओळखल्या जाणा-या ‘महाराष्ट्र’ राज्याच्या नावाचं रहस्य शोधताना आपण पोहोचतो थेट ऋषीमुनींपर्यंत!

उत्खननात सापडलेल्या शिलालेखांवरुन साधरण तिस-या दशकात आर्यांचे या प्रदेशात येणे जाणे सुरु झाले. त्याआधी काही लहान लहान गोत्रे इथे नांदत होती. ‘रटट्’ किंवा ‘मरहट्ट’ या नावाने हे समूह ओळखले जात. शक्यतो ज्ञानेश्वरी किंवा महानुभव साहित्यामध्ये ‘म-हाट व मरहट्ट’ या शब्दांचा उल्लेख आढळतो. पुढे ‘मरहट्ट’ शब्दाच्या अपभ्रंशातून ‘महाराष्ट्र’ शब्द उदयास आला.

तसेच, राजशेखर कवीच्या बालरामायण नाटकात राम, सीता व सुग्रीव विमानात बसून लंकेहून परत जात असताना विमान विदर्भातून जावू लागते, असा प्रसंग आहे. तेव्हा सुग्रीव म्हणतो, “रामा, हा पुढे येणारा प्रदेश महाराष्ट्र बरे का?” तेव्हा राम सीतेला अधिक माहिती देतो, “हीच ती सरस्वतीला जन्मदेणारी विदर्भ भूमी.” अशाप्रकारे, लोकवाड्मयामध्ये महाराष्ट्राला काही काळ विदर्भ नावाने संबोधले जात होते हे लक्षात येते.

संस्कृतीचा ठेवा जपणा-या महाराष्ट्र भूमीची ख्याती आज सर्वदूर पसरली आहे आणि तिचाच भाग असलेले आपण ‘महाराष्ट्रीयन’ असे स्वत:स अभिमानाने संबोधतो देखील, नाही का?

More Articles
Designed and Developed by SocioSquares