750x305_1

निर्भिड लेखणी ‘ती’!

जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येची घटना जीव हेलावणारी आहे. परखड विचारांना निर्घृणरित्या दिलेला हा पूर्णविराम! प्रत्येक स्तरावरुन या घटनेबाबत निषेध व्यक्त केला जातोय. गौरी या बंगळूर मधील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका म्हणून कार्यरत होत्या.

अशक्त, दुबळी, सोशिक अशा प्रतिमेतील ‘ती’ आज इतकी कणखर व धैर्यशील बनलीये. तिच्या विचारांची धगही नकारात्मक शक्तींना सोसवली नाही.

व्यक्तिगणिक विचार बदलतात व हेच विचार मतभेद घडवतात. गौरी लंकेश यांची विचारसरणी, त्यांचा पाठिंबा, विरोध, त्यांचे मित्र किंवा त्यांचे शत्रू या सा-यापलिकडे जाऊन त्यांच्याकडे एक स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून पाहिल्यावर प्रथम जाणवतं, की त्या मुळात एक धाडसी स्त्री होत्या. कुणाचीही भिडभाड न बाळगणा-या, स्पष्टपणे मते मांडणा-या त्या कट्टर स्वावलंबी होत्या. मनात येणारे विचार उघडपणे मांडून विरोधकांशी सामना करण्याची ताकद त्यांच्यापाशी होती. पत्रकारितेचा पेशा व सामाजिक कार्याचे व्रत घेतलेल्या गौरी यांच्या संघर्षाची पातळी फार विशाल होती. अशा अनेक स्त्रिया आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. जोखीम पत्करुन कार्याला न्याय देतायेत. तर, अनेक स्त्रिया दुय्यम वागणूकीच्या फे-यात अडकल्यात. कौटुंबिक वाद, हिंसा, रुढी –परंपरा, अंधश्रद्धेच्या विळख्याशी लढतायेत. यांच्या संघर्षाचे क्षेत्र लहान असले, तरी प्रखरता कायम आहे.

तिचे कार्य, तिची ओळख बनतेय. विचारांच्या जोरावर आपले स्वतंत्र्य अस्तित्त्व सिद्ध करणारी ती समाजातील महत्त्वाचा घटक ठरते. म्हणूनच, ‘गौरी लंकेश’ यांच्याजवळील धैर्यशीलता, साहसीवृत्ती, विचार स्वातंत्र्य त्यांना एक ‘निर्भिड लेखणी’ बनवते!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares