SHOPPING (2)

निवड परफेक्ट सनग्लासेसची!

फॅशनेबल लूकसाठी ‘चेरी ऑन दि टॉप’ असणा-या गॉगल्सचे वेगवेगळे प्रकार बाजारात वर्षभर पहायला मिळतात. गोल, चौकोनी, पंचकोनी अशा कुठल्याही आकारातील फ्रेम्स व भरपूर रंगांमध्ये उपलब्ध असणा-या त्याच्या लेन्सेसना तोडच नाही मात्र हे गॉगल्स ख-या अर्थाने ऑन ड्युटी असतात ते उन्हाळ्यामध्ये, सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांना सुखरुप ठेवणारे सनग्लासेस आता प्रत्येकीच्या पर्समध्ये हमखास असतील आणि असायलाच हवेत कारण डॉळ्यांना थंडावा देण्यासाठी ते गरजेचेच आहेत.

• गॉगल विकत घेताना प्रथम ट्रायल घ्यावी, चेहरापट्टीनुसार शोभून दिसणाराच गॉगल निवडावा.

• वेगवेगळ्या रंगातील गॉगल्स दिसायला जरी आकर्षक असले, तरी उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी ब्लॅक, ब्राऊन किंवा ग्रे असे गडद रंग अधिक फायदेशीर ठरतात.

• स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाचा गॉगल वापरु नये.

• गॉगल विकत घेताना अतिनिल किरणांपासून सुरक्षित असणा-या ग्लासेसची निवड करावी.

• काचेवर चरे पडलेला गॉगल वापरु नये, अशा काचांतून धूरकट दिसण्याने डोळ्यांना त्रासही होऊ शकतो.

• तसेच, गॉगलच्या काचा नियमित स्वच्छ न केल्यास त्याला सतत धूळ व घाम लागल्यानेही धूसर दिसायला लागते.

• टर्कीश रुपाल किंवा पेपर नॅपकीनने ग्लास स्वच्छ केल्यास काचेवर चरे पडू शकतात, म्हणून काचा लेन्स क्लिनर स्प्रेनेच साफ कराव्यात.

• गॉगलसोबत मिळणा-या केसमध्येच गॉगल ठेवावा, बॅगेत किंवा खिशात ठेवल्याने त्याच्या दांड्या वाकून काचाही खराब होऊ शकतात.

• केसमध्ये ठेवताना गॉगलच्या काचा नेहमी वरच्या बाजूस राहतील याची काळजी घ्यावी.

• गॉगलच्या दांड्या वाकल्यास किंवा नोजपॅड निघाल्यास लगेच दुरुस्त करुन घ्यावे, यामुळे गॉगल बॅलेन्स रहातो.

• उन्हाळ्यात चष्मा किंवा गॉगल कारमध्ये ठेवू नये, सततच्या जास्त उष्णतेने ग्लासचे कोटिंग निघू शकते.

उष्णतेपासून डोळ्यांना आराम मिळावा या उद्देशासोबत फॅशन म्हणूनही ड्रेसनुसार गॉगल बदलण्याचा ट्रेंड सुरु आहे. तुम्हीही विविध त-हेचे सनग्लासेस वापरु शकता अगदी बिनधास्त, वरील टिप्सच्या मदतीने योग्य गॉगल निवडता येईल व फेवरेट गॉगलची प्रमाने जपणूकही करता येईल!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares