travel banner 1

पर्यटनाला जाताना घ्यायची काळजी :

प्रवासाला निघताना सगळ्याच बाजूने विचार करावा लागतो. प्रवासासाठीची उत्सुकता इतकी असते कि आपण सगळ्याच गोष्टींची तयारी अगदी मन लावून करतो; पण या सगळ्यांमध्ये सुरक्षेच्या बाबतची खबरदारी नेहमी बाजूला ठेवली जाते. या सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

१. लक्षात ठेवा प्रवासाला निघताना कोणत्याही महागड्या वस्तू, दाग-दागिने सोबत नेऊ नका. अशा वस्तू सोबत घेतल्या तर आपले लक्ष त्याच गोष्टींकडे जाईल आणि तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकणार नाही.

२. आपण जिथल्या हॉटेलमध्ये राहणार आहोत त्या हॉटेलची सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आजकाल ऑनलाइन बुकिंग करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करताना नियम व अटी सविस्तर वाचून घ्या त्यात काही शंका असल्यास वेळीच त्याच्या हेल्पलाइनला फोन करून शंकांचे निरसन करून घ्या.

३. प्रवासादरम्यान झोप घेताना सावध रहा. आपल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे नीट लक्षात ठेवा.

४. प्रवासाचे तपशील आपल्या सोबत असलेल्यांना समजावून ठेवणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर आपल्या सोबत नसलेल्या जवळच्या लोकांना देखील आपल्या प्रवासाचे तपशील देऊन ठेवा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares