white hair banner

अकाली केस पिकण्यावर घरगुती उपाय!

सौंदर्य खुलविणा-या नवनव्या हेअर स्टाईल्स करुन पाहाण्यासाठी तितकेच निरोगी केसही हवेत. अकाली केस पांढरे होऊ लागले, की हे पांढरे केस लपविण्यासाठी डाय करण्याचे काम कायमचे मागे लागते. मात्र, असे केल्याने केस पिकण्यावर निर्बंध येत नाही. उलट डायमधील केमिकल्समुळे केस अधिक वेगाने पिकण्याची शक्यता असते. म्हणूनच अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येला तोंड देत असाल, तर पुढील पाच घरगुती उपाय नक्की करुन पाहा.

१. पांढ-या केसांच्या समस्येवर दही अत्यंत फायदेशीर असून, मेहंदी व दही समान प्रमाणात भिजवून केसांना लावावे. शक्यतो, आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.

२. औषधी कोरफड देखील पांढ-या केसांसाठी गुणकारी आहे. कोरफडीचा गर काढून, त्यामध्ये लिंबू पिळून हे मिश्रण केसांना लावावे व थोडा वेळ तसेच ठेवून केस स्वच्छ धुवावेत.

३. कॉफीचा अर्क देखील पांढ-या केसांची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त असून, कॉफीच्या अर्काने केस धुणे फायदेशीर ठरते.

४. आवळा केसाच्या कुठल्याही समस्येवर रामबाण औषध असून, अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचे बारीक तुकडे खोबरेल तेलात टाकून हे तेल केसांना नियमित लावावे.

५. केस पांढरे होण्यामागील महत्त्वाचे कारण असते शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता. केसांना ही पोषक द्रव्ये गाईच्या दूधातून भरपूर प्रमाणात मिळतात. म्हणूनच अकाली केस पांढरे होत असतील, तर आहारात गाईच्या दूधाचा समावेश आवर्जुन करावा.

लहान वयातच केस पिकू लागले, तर घरगुती उपाय नक्की सहाय्यक ठरतील. अगदी सहजरित्या उपलब्ध होणा-या जिन्नसांचा यामध्ये समावेश असून, कुठल्याही साईड इफेक्ट्सची चिंता नाही हे महत्त्वाचे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares