mOBILE cARE (2)

पावसाला घाबरतोय फोन!

रिमझिम सरींनी पावसाच्या येण्याची चाहूल दिलीये. पावसाळ्यात भिजून चिंब व्हायला होते, म्हणून घरात दडून बसण्याचा पर्याय उपलब्ध नाही. शाळा, कॉलेज, ऑफीसेस नियमित सुरु असतात, त्यामुळे छत्री, रेनकोट वापरुन आपण स्वत:चे संरक्षण करतो. मग, सदासर्वकाळ सोबत असणारा मोबाईल पावसात भिजेल या भीतीने घरी ठेवून जाणे शक्य नाही. म्हणूनच, पावसाळ्यात मोबाईलची काळजी घ्या अशाप्रकारे,

टॅम्पर्ड कव्हर ग्लास:
मोबाईल भिजल्यावर डिस्प्लेमध्ये पाणी जाऊन मोबाईल खराब होऊ शकतो. यासाठी, स्क्रीनवर टॅम्पर्ड ग्लास कव्हर लावून घ्यावे, यामुळे डिस्प्लेमध्ये पाणी जाण्याची शक्यता कमी होते.

वॉटर प्रुफ कव्हर:
मोबाईलसारख्या प्रिय वस्तूला पावसात घेऊन जाताना, तो भिजणार नाही यासाठी वॉटर प्रुफ उपाय हवाच! प्लॅस्टिकचे वॉटर प्रुफ कव्हर यासाठी योग्य पर्याय ठरेल. यामध्ये फोनचे सर्व पार्ट पाण्यापासून सुरक्षित रहातात. थोडे बजेट वाढेल पण फोनच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता किंवा बाजारात मिळणारी प्लॅस्टिक पॉकीट्स देखील स्वस्त आणि मस्त पर्याय आहेत.

ब्ल्यु-टूथ:
ब्ल्यु-टूथ हेडसेट्सच्या वापराने मोबाईल कोरडा ठेवणे शक्य होईल. ब्ल्यु-टूथद्वारे कॉल्सवर बोलून, मोबाईलही बॅगमध्ये ठेवून निश्चिंत वावरता येते आणि ब्ल्यु-टूथ वॉटर प्रूफ असल्याने ते खराब होण्याचीही चिंता नसते.

पॉवर बॅंक:
पावसाळ्यातही फोन जवळ बाळगणे महत्त्वाचे आहेच, सोबत त्याची बॅटरी नीट चार्ज असणेही गरजेचे आहे. यासाठी, वॉटर प्रुफ पॉवर बॅंकचा वापर करावा. ही पॉवर बॅंक भिजली, तरी तुमच्या फोनला चार्ज करण्याचे काम थांबणार नाही.

वरील उपाय करण्यास उशीर केलात व मोबाईल पावसात भिजला, तर तुमच्या या दोस्ताला ठणठणीत बरे करणा-या पुढील टिप्स मात्र लक्षात ठेवा.

मोबाईल चार्जिंग:
मोबाईल ओला असताना चार्जिंगल लावू नये. मोबाईल चार्जरचे सॉकेट नीट तपासून पाहावे. सॉकेट ओले असल्यास विजेचा दाब अधिक पडून मोबाईल बिघडू शकतो. म्हणूनच, मोबाईल संपूर्ण कोरडा झाल्यावरच चार्जिंगला लावावा.

बॅटरी, सीमकार्ड, मेमरी कार्ड:
मोबाईल भिजल्यावर प्रथम त्यामधील बॅटरी, समीकार्ड व मेमरीकार्ड काढून ठेवावे. प्रथम भिजलेला मोबाईल उन्हात सुकवून घ्यावा. किंवा भांड्यामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवावा.

मोबाईल कोरडा करताना:
मोबाईल आतील बाजूने कोरडा करण्यासाठी बहुतेकदा हेअर ड्रायरचा वापर केला जातो. या ड्रायरच्या गरम हवेने मोबाईलमधील नाजूक प्रणालीला बिघडवू शकते. म्हणूनच, भिजलेला फोन कोरडा करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनरचा पर्याय योग्य ठरेल.

अशाप्रकारे, प्रत्येक क्षणी साथ देणा-या फोनची विशेष काळजी तर घ्यायलाच हवी. लहान मोठ्या पावसापासून मोबाईल सुखरुप ठेवून, तुम्ही निश्चिंतपणे पावसाचा आनंद घ्या.

More Articles
Designed and Developed by SocioSquares