Rainy season (1)

पावसाळ्यात कपड्यांची काळजी घ्यावी अशी!

अमृततूल्य पाणी देणारा पावसाळा निर्सगावर हिरवीगार शाल पांघरतो आणि आपली उडणारी तारांबळ, मजेत पाहतो. प्रत्येकाचा प्रिय पावसाळा आला, की तब्येतीवर परिणाम होतात तसे कपड्यांवरही आणि कपड्यांची विशेष काळजी घेण्याचे वाढीव काम मागे लागते. म्हणून त्यांचेही आरोग्य जपावे अशाप्रकारे,

१. कपडे पावसाच्या पाण्यात भिजले, की त्यावर काळे डाग पडतात. बरेचदा वॉशिंग पावडरने धुवूनही हे डाग जात नाहीत व कपडा खराब होतो.

२. कपड्यांतील या ओलसरपणामुळे त्यांना बुरशी येते, यामुळे त्वचेला खाज येणे, पुरळ उठणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी पावसात भिजलेले कपडे साचवून ठेवू नयेत. खालीलपैकी उपलब्ध पर्यायाचा वापर करुन लवकर धुवून व सुकवून घ्यावेत…

३. कपडे सुकविण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे, पंख्याची हवा! खोलीभर कपडे पसरवले, की कमीतकमी वेळात कपडे सुकतात किंवा पुरेशी जागा असल्यास दोरी बांधण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

४. वॉशिंग मशीनसोबत ड्रायर मशीन असेल, तर उत्तमच! गरजेनुसार त्यावर दिलेल्या पर्यायांचा वापर केल्यास कपडे सुकविण्याचे काम सुलभ होते व ड्रायर मशीन नसले, तरी हरकत नाही. खालील पर्याय आहेत ना!

५. तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करु शकता, ड्रायरची गरम हवा कपडे सुकविण्यासाठी पुरेशी असते.

६. लहानश्या खोलीत कपडे सुकविण्यासाठी दोरी बांधणे शक्य नसते. अशावेळी स्टॅंड उपयोगी ठरतो. कपड्यांच्या प्रमाणानुसार त्याचा आकार लहान मोठा करता येतो.

७. एखादा न सुकलेला ड्रेस किंवा शर्ट ताबडतोब हवा असेल, तर इस्त्रीचा वापर करु शकता. हा प्रयोग करताना कपड्याचा पोत समजून इस्त्रीचा वापर करायला हवा. नाहीतर घाईघाईत वारलेला हा शॉर्टकट काम वाढवून ठेवेल.

८. दमट कपडे कपाटात ठेवल्यास त्या कपड्यांसोबत, कपाटातील इतर कपड्यांनाही कुबट वास येतो. यासाठी, कपडे संपूर्ण कोरडे होऊ द्यावेत. तसेच, कडुलिंबाची पाने कपाटात ठेवावीत, यामुळे किटकांपासून कपड्यांचे संरक्षण होते.

कपड्यांच्या काळजीत पावसाचा आनंद घेणे राहून जाऊ नये म्हणून, कपड्यांची निगा राखणा-या या पावसाळी टिप्स नक्की वापरुन पाहा व तुम्हाला कशा वाटल्या हे देखील सांगा खालील कमेन्ट्सद्वारे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares