pendrive (1)

पेनड्राईव्ह विकत घेताय, मग आधी ‘हे’ वाचा!

किचकट वाटणा-या तंत्रज्ञानाशी मैत्री करायची, तर त्यातील लहान सहान बारकावे समजून घ्यायला हवेत. रोजची कामे झपझप आटपण्यासाठी आपण क्षणोक्षणी नवतंत्रज्ञानाची मदत घेतो किंवा काही ठराविक कामे इतकी यांत्रिक झालीत, की ती स्वतंत्रपणे करणे शक्यच नसते. आधुनिक तंत्रज्ञान कठीण वाटले, तरी प्रत्येकानी शिकून घेणे अत्यावश्यक आहे.

जसे, डाटा एकाठिकाणहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी वापरला जाणारा ‘पेनड्राईव्ह’ तुम्हाला माहित असेलच. शक्यतो, हे यंत्र विकत घेताना त्याचा आकार किंवा माहिती साठवण्याची क्षमता पाहिली जाते. ५०० ते २००० किंवा त्याहून जास्त किंमतीचे पेनड्राईव्ह बाजारात उपलब्ध आहेत. ते विकत घेताना फक्त त्याचे बाह्यरुप व GB चे आकडे न पाहता आणखी थोडे चिकित्सक व्हायला हवे. पुढील बाबींचाही विचार करायला हवा.

  • वजन व आकार –

आकाराने लहान असणा-या वस्तू वापरण्यास सोयीस्कर असल्या, तरी पेनड्राईव्ह विकत घेताना हा विचार थोडा बाजूला ठेवावा लागेल. कारण, थोडा वजनदार पेनड्राईव्ह चांगल्या वस्तूंच्या वापरातून बनवल्याचे मानले जाते. तसेच, आकार जितका मोठा व सुटसुटीत तितका पेनड्राईव्ह दर्जेदार ठरतो.

  • सुरक्षितता –

हल्ली मोबाईल किंवा लॅपटॉपला सर्रास पासवर्ड ठेवलेले दिसतात. नव्या मोबाईल्समध्ये फिंगर प्रिंट लॉकही आहे. पेनड्राईव्हमध्येही सुरक्षा यंत्रणेचा शिरकाव झाला आहे. पासवर्डच्या मदतीने आपण पेनड्राईव्हमध्ये साठवलेला डाटा सुरक्षित ठेवू शकतो.

  • वेग –

डाटा कॉपी करण्याचा वेग पेनड्राईव्हमधील सर्व्हरवर अवलंबून असतो. युएसबी २.०, युएसबी ३.० व युएसबी ४.० अशा सर्वसाधारण ३ प्रकारांमधील फरक समजून घ्यायचा, तर २५ जीबीच्या(ब्लूरे) फाईल्स कॉपी करण्यासाठी युएसबी २.० असणा-या पेनड्राईव्हला १५ मिनिटे लागतील, युएसबी ३.० असल्यास २ मिनिटे व युएसबी ४.० असल्यास साधारण काही सेकंदात फाईल्स कॉपी होतील.

  • प्रकार –

पेनड्राईव्हचे काही प्रकारही समजून घ्यायला हवेत, जेणेकरुन गरजेनुसार त्यापैकी योग्य ते निवडता येतील. ओटीजी पेनड्राईव्ह जे कॉम्पूटर, तसेच मोबाईलला जोडता येतात. वायरलेस पेनड्राईव्ह जे वायफायच्या सहाय्याने इतर यंत्रांशी जोडले जातात.

चला तर, यापुढे पेनड्राईव्ह विकत घेताना दुकानदाराला विचारुन अगदी पटाईतपणे अचूक तेच निवडाल यात शंकाच नाही. नवयुगातील नवीतंत्रे अवघड वाटली, तरी जगासोबत पळायचे तर त्यांच्याशी मैत्री करायलाच हवी ना!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares