Poha Cutlet (1)

पोह्याचे कटलेट

टिफीनला नेहमी चपाती भाजी न्यायला छोट्यांइतकेच मोठेही कधीकधी कंटाळतात. याला पर्याय म्हणून पोटभरु पण तितकाच पौष्टिक पदार्थ देत आहोत, जो सकाळच्या घाईगडबडीत देखील झटपट तयार होतो. पोह्याचे कटलेट एकदम चमचमीत!

साहित्य: 3 उकडलेले बटाटे, २ वाट्या भिजवलेले पोहे, १ कांदा, १ टी.स्पू. चाट मसाला, १ चमचा हळद, १ चमचा मिरची पावडर (आवडीनुसार), आलं लसूण पेस्ट, एक चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर, तेल, मीठ.

आवरणासाठी – १ वाटी तांदूळाचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, मीठ, ब्रेड क्रम्स

पाककृती:  प्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे कुस्ककरुन घ्यावेत. त्यामध्ये भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला, हळद, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ हे सर्व जिन्नस घालून, नीट एकजीव करुन घ्यावेत. आता या तयार मिश्रणाचे लहान गोळे करुन त्यांवर थोडा दाब देत, त्यांना चपट आकार द्यावा.

आता, तांदळाचे पीठ व कॉर्नफॉवरचे पीठ एकत्र करुन त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवून घ्यावी.

त्यानंतर, कटलेट या मिश्रणात बुडवल्यावर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावेत आणि मग तेलात छान तपकिरी रंगाचे होईस्तोवर तळून घ्यावेत.

अशाप्रकारे, तयार झालेले पोह्याचे कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत खायला द्यावेत.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares