car (2)

प्रवासात स्वास्थ्य सांभाळावे असे..!

प्रवासाला निघायचं म्हटलं, की मूड अगदी फ्रेश होतो. या आनंदासोबत प्रवासासोबत सुरु होणा-या तब्येतीच्या समस्या मात्र जीव नकोसा करतात. गाडीच्या हलण्याने डोक दुखतं, चक्कर येते, मळमळते उलट सुलट खाण्याने पोटातही दुखते. या समस्या टाळत प्रवास पूर्ण करायचा, तर पुढील उपाय तुमची मदत करतील.

१. प्रवासाला निघण्याआधी वेलची घातलेला चहा प्यावा किंवा प्रवासात वेलची चघळावी.

२. लिंबू व पुदिन्याच्या रसामध्ये थोडे काळे मीठ टाकावे; प्रवासात या रसाचे सेवन करावे.

३. जलजिरा देखील उत्तम पर्याय असून, यामुळे मळमळ थांबून शरीराला थंडावाही मिळतो.

४. प्रवासाला निघताना आल्याचा तुकडा तोंडात ठेवणेही उपयुक्त ठरेल.

५. या घरगुती औषधांसोबत प्रवासात घेतलेला खाऊ विचारपूर्वक घ्यावा लागतो. कुठलेही तिखट किंवा आंबट पदार्थ शक्यतो टाळावेत.

६. तेलकट वा हवाबंद पॅकेट्स मधील पदार्थ कॅरी करणे सोप्पे असले, तरी अशा पदार्थांमुळे अपचन वाढते.

७. दूध, ज्यूस अशा द्रवरुप पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.

८. मुख्यत्वे फलाहार घ्यावा. शरीरातील पाण्याचे संतुलन साधण्यासाठी फलाहार उपयुक्त ठरतो.

९. एसी गाडी आरामदायी वाटली, तरी काहींना ते कोंदट वातावरण किंवा फ्रेशनरच्या सुंगधाने त्रास होतो. अशावेळी अधून मधून गाडीच्या खिडक्या उघडाव्यात यामुळे हवा खेळती राहील.

अशाप्रकारे, प्रवासाला निघण्यासाठी आरोग्याची काळजी घेणा-या या टिप्स लक्षात ठेवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी या उपयोगी ठरतील व प्रत्येकाचा प्रवास सुखकर ठरतील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares