Cloths (1)

बलात्कारास कपडे जबाबदार नसतात!

एकाबाजूला स्त्रीभ्रूण हत्येची विकृती वाढतेय, तर दुसरीकडे आपल्याला कन्यरत्नच व्हावे, अशी इच्छा मनी बाळगणारे पालकही दिसतायेत. पण, ते देखील मुलीच्या सुरक्षेचा विचार करुन मनोमन तितकेच धास्तावलेले असतात. जाणिवांच्या सर्व मर्यादा वेगाने ओलांड़ू लागलेला हा बलात्कारी राक्षस ३ ते ४ वर्षाच्या लहानश्या मुलीसही आपले भक्ष बनवतो.

मुलीच्या जन्मासोबतच आईबाबांच्या डोक्यावर तिच्या असुरक्षिततेची टांकती तलावर अगदी कायमचीच वस्तीला येते आणि काळजीपोटी तिच्यावरील बंधने तिच्या वयासोबत हळूहळू वाढू लागतात. घरातले बसणे उठणे ते चारचौघात वावरताना तू मुलगी आहेच याची जाणीव ठेवण्याचे शिकवले जाते. यातच फॅशन बाजूला ठेवून अंगभर कपडे घालण्याचा आग्रह धरणा-या पालकांचा हेतू साधासरळ मुलीकडे कुणी वाईट नजरेने पाहू नये याचा असतो. पण, नीटनीटके कपडे घालणारी मुलगी खरच सुरक्षित आहे का?

बलात्काराची घटना कानी पडताच, ‘तिने काय कपडे घातले होते?’ या प्रश्नाचा उहापोह करुन पिडीतेच्या कपड्यांना दोष देणा­-या महाभागांनी बेल्जियममधील या प्रदर्शनाची छायाचित्रे पाहावीत. पीडित महिलांच्या कपड्यांच्या प्रतिकृतींचे हे प्रदर्शन बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये भरविले होते. या प्रदर्शनात शर्ट पॅन्ट, टी-शर्ट, जीन्स, स्त्रियांचे युनिफॉर्म्स, पूर्ण लांबीच्या गाऊनपासून लहानग्या मुलींचे घेरदार फ्रॉक्स इथे दिसतात. त्यापैकी बहुतांश नेटक्या कपड्यांच्याच गटात बसतात.

प्रदर्शनात ठेवलेला प्रत्येक पेहराव स्वत:ची कथा सांगतो. पिडीतांतील चार ते पाच वर्षाच्या मुलीने फ्रॉक घातला होता. बास्केटबॉल खेळणा-या तरुणीने टी-शर्ट, पॅंन्ट घालते होते, ड्युटीवर असलेल्या महिलेने शर्ट पॅन्ट असा युनिफॉर्म परिधान केला होता. अशा अनेक कथा, तेथील कपड्यांशेजारी लावलेल्या माहितीवर वाचता येतात आणि पिडीतेच्या कपड्यांना दोष देण्याचे धाडसच होत नाही. मुलींनी संयमाने वागावे, तिने तोकडे किंवा तंग कपडे घालू नयेत, चर्चेचा विषय ठरावे इतके अंगप्रदर्शन करु नये. हे तिच्या हिताचे आहेच. पण, कपडे विकृत नजरांना रोखू शकत नाहीत हेच ब्रुसेल्समधील या प्रदर्शनावरुन दिसते.

मुलींच्या संरक्षणाची समस्या पुन्हा एकदा जम्मू काश्मिरमध्ये घडलेल्या असिफा बलात्कार प्रकरणाद्वारे देशासमोर उभी ठाकली आहे. त्या आठ वर्षीय मुलीच्या कपड्यांना दोष देण्याची कुणाची हिंमत व्हावी? बहुतांश पिडीत महिलांसारखेच या लहानगीचे कपडे या अत्याचारात निर्दोष आहेत हेच खरे!

Image Source- https://goo.gl/BkauB9

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares