bookshelf (1)

बुकशेल्फची हटके डिझाईन्स!

पुस्तक प्रेमींच्या घरातील पुस्तकांचा ढिग कायमच वाढत जाणारा असतो. यात नव्या पुस्तकांची उत्साहाने भर पडते, तर जुन्या पुस्तकांना तितकेच जपावे लागते. कपड्यांसाठी कपाट, सजावटीच्या वस्तूंचे शोकेस, किचनमधील भांड्यांच्या ट्रॉलीज जितक्या महत्तम, तितकेच आवडत्या पुस्तकांना नेटके ठेवणारे बुकशेल्फही हवे! खोली मोठी असो किंवा लहान कल्पकरित्या बुकशेल्फची रचना केल्यास पुस्तके रचून ठेवण्याचे काम सोप्पे होईल. यासाठीच, देत आहोत बुकशेल्फच्या काही हटक्या डिझाईन्स!

  1. हे बुकशेल्फ कमी जागा व्यापतात, तसेच हे एका जागेवरुन दुस-या जागी हलवणेही सोयीचे आहे. यामध्ये, एकावेळी भरपूर पुस्तके ठेवता येतील.

Standy bookshelf

 

2. खोलीतील कोप-यात अशाप्रकारे पुस्तकांची त्रिकोणी पद्धतीत मांडणी केल्यास खोलीतील फर्निचर स्टाईलला निराळा लूक येईल. पुस्तकांसोबत शो पीस ठेवून खोली अधिक आकर्षक बनवता येईल.

 

corner

3. कमी जागेत जास्तीत जास्त पुस्तके ठेवायची तर अशा काही युक्त्या योजाव्याच लागतील. पुस्तकांच्या दुकानात गोलाकार फिरत्या रॅकवर पुस्तके विक्रीसाठी ठेवलेली असतात. घरच्या बुकशेल्फसाठी असाच रॅक वापरता येईल.

 

space saver

4. भरपूर पुस्तके असतील आणि नवनवे प्रयोग करता येईल अशी मोकळी जागाही घरात असेल, तर खालील आकर्षक डिझाईन्सचा नक्कीच विचार करता येईल.

wide space

5. स्वतंत्र्य बुकशेल्फ न बनवता घरातील फर्निचरचाच बुकशेल्फ ही एक भाग बनली, तर? आकर्षक लूक येईलच व बसल्याजागी पुस्तके वाचून पुन्हा जागच्याजागी ठेवणेही सोयीचे होईल.

chair

तुम्हाला वाचनाचे वेड असेल, तर तुम्हीही पुस्तकांना जीवापाड जपणा-यांपैकीच एक असाल! घरात पुस्तकांची  राखीव जागा पसा-यासमान दिसू नये, म्हणून तिला साजिरे रुप देणा-या बुकशेल्फच्या या हटके डिझाईन्सचा नक्की विचार करा व प्रतिक्रियांसोबत तुमच्या घरातील बुकशेल्फचा फोटोही पोस्ट करा कमेन्टबॉक्समध्ये,

Image Source – pinterest.com

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares