bANK (1)

बॅंकलॉकर घेताना असे सतर्क रहावे!

स्त्री असो किंवा पुरुष सोन्या चांदीचे दागिने कायमच प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. सौंदर्य खुलविणा-या दागिंन्याकडे गुंतवणूकीचा पर्याय म्हणूनही पाहिले जाते. मात्र, या मौल्यवान चिजवस्तूंची जपणूक करणे देखील मोठे जोखमीचे काम. ते घरच्या लॉकरमध्ये कितीही सांभाळून ठेवले, तरी चोरी किंवा गहाळ होण्याची काळजी सतत सतावते, यावर उपाय म्हणून व्यक्ती बॅंक लॉकर्सच्या सुविधे विचार करतो.

दागदागिंन्यासोबत महत्त्वाची कागदपत्रेही या लॉकरमध्ये सुरक्षित रहाणार ही निश्चिंतता ग्राहकांना असते. मात्र, बॅंक विश्वासार्ह असली, तरी ग्राहकांनीही असे लॉकर घेताना थोडी सतर्कता बाळगायला हवी. यासाठी बॅंकेत लॉकर बुक करताना पुढील ५ मुद्दे ध्यानात ठेवावेत.

  • सर्वप्रथम बॅंकेचे लॉकरसंबंधीचे नियम व अटी नीट समजून घ्याव्यात.
  • लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची नीट यादी करावी व ती कायम जपून ठेवावी.
  • त्यातील दागिन्यांची बिले मुख्यत्वे घरी सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. कारण, चोरी झाल्यास पुराव्यासाठी हेच दागिने उपयुक्त ठरतात.
  • लॉकरची डुब्लीकेट किल्ली बनविण्यापेक्षा मुख्य किल्लीच नीट जपून ठेवावी.
  • वर्षातून तीन चार वेळा तरी लॉकर उघडावा व लॉकर उघडताना किंवा बंद केल्यावर काही वस्तू बाहेर राहून न गेल्याची खात्री करुन घ्यावी.

अशाप्रकारे, बॅंक लॉकर सुविधेचा वापर करताना योग्य खबरदारी बाळगायला हवी. कारण, संपत्तीची काळजी घेण्यासाठी कुठलीही दिरंगाई करुन चालत नाही!!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares