ब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक! (1)

ब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक!

उन्हामुळे काळसर झालेल्या त्वचेस उजळ बनविणारे घरगुती फेसपॅक! बाजारात मिळणा-या फेसपॅकमुळे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते, म्हणूनच असे फेसपॅक निवडताना आपल्याला फारच सतर्क रहावे लागते. मात्र, घरी तयार केलेले फेसपॅक्स कुठलीही चिंता न करता आपण निश्चिंतपणे चेह-यावर लावू शकतो. हे फेसपॅक नैसर्गिक जीवनसत्त्वेही देतात व घरातील जिन्नस वापरल्यामुळे छान स्वस्तही ठरतात.

१. सततच्या घामामुळे तेलकट होणा-या त्वचेवर टॉमेटोचा पॅक लावणे उपयुक्त ठरेल. पॅक बनवताना मिक्समध्ये १ टॉमेटो, १ चमचा जईचे पीठ, १ चमचा लिंबू घट्ट असे वाटून घ्यावे. साधारण १० मिनिटे चेह-यावर लावावे व कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

२. ‘क’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण असणा-या संत्र्याचा पॅक बनवताना, प्रथम संत्र्याची साले उन्हात वाळवून घ्यावी. नंतर, मिक्सरमध्ये फिरवून त्याची पूड करुन घ्यावी. या पावडरमध्ये ४ ते ५ गुलाबाच्या पाकळ्या, १ चमचा व थोडे दूध एकत्र करावे. तयार झालेली पेस्ट साधरण ३० मिनिटे चेह-यावर लावावी.

३. नारळ पाणी, कच्चं दूध, काकडीचा रस, लिंबाचा रस, बेसन व थोडेशी चंदन पावडर असे सर्व जिन्नस एकजीव करावेत. तयार पेस्ट अंघोळीच्या एक तास आधी चेह-यावर लावावी. साधारण आठवड्यातून दोनदा ही पेस्ट वापरावी, त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

४. डोळ्याखालील काळी वर्तुळे उन्हाळ्यात थकव्यामुळे आणखी वाढतात. यावर उपाय म्हणून मधात केसर मिसळून डोळ्याखाली लावावे, शिवाय बटाट्याचा रसही डोळ्याच्या भोवती लावल्यास उपयुक्त ठरतो.

५. एक चमचा हरभरा डाळीच्या पीठात दोन चमचे दही व दोन थेंब मध मिसळावे. तयार पेस्ट अर्धा तास चेह-यावर लावून ठेवावी.

६. थंडगार काकडीच्या वापरातून फेसपॅक बनवताना, काकडी मिक्समध्ये फिरवून घ्यावी व त्यामध्ये थोडे दूध मिसळावे. तयार झालेला लेप साधारण तासभर चेह-यावर लावून ठेवावा. यामुळे, कोरडी त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

स्वत:च्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी कुठलेही वयाचे बंधन नसते, तेव्हा सुंदरतेची जपणूक प्रत्येकीने करायलाच हवी. यासाठी सौंदर्यविषयावरील माहितीपर ब्लॉग्स आम्ही घेऊन येत राहूच, सध्या वरील ‘घरगुती फेसपॅक्स तुम्हाला कसे वाटले?’ हे नक्की कळवा खालील कमेन्टबॉक्सद्वारे!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares