diwali sweets (1)

भेसळयुक्त मिठाई ओळखावी कशी? वाचा इथे…

दिवाळी जवळ येताच, नानाप्रकारची दुकाने ग्राहकांच्या गर्दीत अगदी गुडूप होतात. कपडे, शोभेच्या वस्तू, कंदील, पणत्या, फराळ, मिठाई सारंच खरेदी करण्यात आपण व्यस्त होतो. ऑफीसच्या वेळा सांभाळत शॉपिंगचा कार्यक्रम उरकताना फार धावपळ होते. त्यामुळे, खरेदीच्या वेळी ब-याचदा वस्तूंच्या गुणवत्तेवर दुर्लक्ष होतं. कपडे किंवा शोभेच्या वस्तूंत काही दोष असल्यास आपण दूकानदाराकडून ती वस्तू बदलून घेऊ शकतो. मात्र, खाण्याच्या वस्तू याला अपवाद ठरतात, कारण या वस्तूंमधील दोष साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्याचे दुष्परिणाम थेट आरोग्यावर होतात. स्वास्थ्य बिघडल्यावर खाद्यपदार्थांत काहितरी गडबड असल्याची शंका येते.

सणासुदीला आपण ब-याच नातेवाईकांच्या, स्नेहींच्या घरी जातो. तेही शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येतात. अशावेळी, फराळाची मिठाईची देवाण घेवाण होते. यापैकी मिठाई नेहमीच रेडीमेड असते. मिठाई प्रकारास मागणी खूप असल्याने दूकानदार कमी भांडवलात भरपूर उत्पादन घेण्यावर भर देतात. यामुळे, मिठाईत कुठल्याही प्रकारची भेसळ तर नाही ना हे तपासायला हवे.

  1. रबडी सारख्या गोड पदार्थात टिशू पेपरची भेसळ केली जाते. ती ओळखण्यासाठी रबडीच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे काही थेंब व थोडे पाणी मिसळा. हे मिश्रण परिक्षानळीमध्ये घेऊन ढवळा. जर तंतू नळीवर जमा झाले, तर कागदाची भेसळ आहे असे समजावे.
  2. बहुतांश मिठाईवर चांदीचा वर्ख लावला जातो. त्यामुळ, ती छान चकाकते व आकर्षक दिसते. पण योग्य वर्ख न वापरल्यास तोही शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो. कधीकधी वर्खास पर्याय म्हणून ऍल्युमिनिअमची फॉईल वापरली जाते. ती ओळखण्यासाठी मिठाईवर लावलेला वर्ख जाळावा. त्याची लहान गोळी न होता, वर्ख घट्ट करड्या रंगाचा झाल्यास ती ऍल्युमिनिअमची फॉईल असेल. यासाठीची पर्यायी पद्धत अशी, की वर्खाच्या नमुना कोमट पाण्यात टाकावा. त्यात डायड्रोक्लोरिक ऍसिडचे काही थेंब टाकावेत. मिश्रणात हायड्रोजनचे बुडबुडे आल्यास भेसळ असल्याचे समजते.
  3. मिठाई ताजी व आकर्षक दिसावी म्हणून, त्यात मेटॅलिक यल्लो हा रंग वापरला जातो. ही भेसळ ओळखण्यासाठी मिठाईच्या तुकड्यावर हायड्रोक्लोरिक ऍसिडचे काही थेंब टाकावेत. कृत्रिम रंगाचा वापर केला असल्यास मिठाईला जांभळा रंग येईल.

आपण शाळेत शिकलेलो रसायनशास्त्र आरोग्यासाठी अशाप्रकारे उपयुक्त ठरतयं. त्यामुळे, यापुढे मिठाईच्या गुणवत्तेविषयी शंका आल्यास ताबडतोब वरील युक्त्या वापरुन ती तपासता येईल. तुम्ही तयार आहात ना मिठाईवाल्याची परीक्षा घ्यायला?

More Articles
Designed and Developed by SocioSquares