Voting Banner

मतदान – परम अधिकार की आदय कर्तव्य

आधुनिक जनता, २१ व्या शतकातली जनता.. कधीकधी फार अभिमान वाटतो मला की आजची ही सर्व बाबतीत आधुनिक असलेली जनता किती तत्पर आहे सगळ्याच बाबतीत. एखादा सण, समारंभ किंवा मग उत्सव असेल तर सगळेच किती लगबगीने कामाला लागतो. आज आपल्या प्रत्येक सणात आपण सगळेच हिरीरीने भाग घेतो. चांगल्या पारंपारिक वेशात तयार असतो. मग भलेही ते सोशल मीडिया वर फोटोज अपलोड करायचे असतात म्हणून का असेना! पाडवा म्हणू नका, गणपती म्हणू नका, दिवाळी ते अगदी होळीपर्यंत प्रत्येक सण किंवा कुठल्याही साधारण दिवसाच औचित्य साधून येणारा प्रत्येक दिवस कसा साजरा करायचा हे आपण प्रत्येकाने  ठरवलेलं असत.

उदाहरणच दयायची झाली तर या वीकेंड ला कुठला चांगला चित्रपट प्रदर्शित होत असेल तर बघायला जाण, महिन्याच्या शेवटी प्रशांत दामलेच एक चांगल प्रायोगिक नाटक येत आहे तर त्याच बुकिंग करण, ipl कधीपासून चालू होतेय रे, या वर्षी न मला Mumbai indians ची match पाहायला जायचच आहे आणि ते शक्य नाही झाल तर आपण सगळ्या matches आपण बघतोच. या वर्षी बिग बॉस कधी सुरु होणार आहे, एक सुद्धा एपिसोड चुकवायचा नाहीये. मग काय सूर नवा, ध्यास नवा..त्यानंतर परत आपला लाडका आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे world cup तो ही आपण चुकवू शकत नाही. मग काय प्रो कबड्डी लीग.. ह्या सगळ्या गोष्टीतून आपला वैयक्तिक फायदा काहीच नसतो. पण या गोष्टी केल्याने आपल्या मनाला समाधान मिळत असत म्हणून आपण करत असतो.

ह्याच्यासारखी अशी अनेक उदाहरणे आहेत. पण जेव्हा 5 वर्षातून फक्त 1 ते 2 वेळा निवडणुका येतात आणि त्यासाठी जेव्हा आपल्याला मतदान करण्याची वेळ येते तेव्हा आपण का मागे पडतो. एरव्ही रोजच्या आयुष्यात वावरताना आपण जवळजवळ सर्वच बाबतीत हुशार, स्मार्ट, सजग, जागरूक, दक्ष वगैरेवगैरे असतो. पण देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठी जेव्हा एखादा मोठा निर्णय घेण्याची, देशाचा पंतप्रधान निवडण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यातली ही फक्त आव आणण्यापुरती सिमित असलेली जागरूकता कुठे बरं लोप पावते. इतका मोठा आणि महत्वाचा निर्णय आपण स्वतः मतदान न करता इतर मतदात्यांच्या हवाली सोपवून कसे काय मोकळे होऊ शकतो? जेव्हा आपण मतदान करीत नाही. तेव्हा देशाच्या राज्यकारभारात 5 वर्षे ज्या घडामोडी होतात, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे चांगले किंवा वाईट मत देण्याचा अधिकार आपण पूर्णपणे गमावतो. एखाद्या निवांत ठिकाणी बसून चहाचे घुटके घेताना, देशाच्या राजकारणात काय ठेवलंय असं म्हणण्याचाही अधिकार तुम्हाला उरत नाही. त्यामुळे मतदान करणे ही आपली महत्वपूर्ण सार्वत्रिक जबाबदारी आहे. मतदानाची माहिती, त्याचे महत्व नसलेल्या जिल्ह्यात 60 टक्के व त्याहीपेक्षा जास्त मतदान होते. तर मग मुंबई-पुणे यांसारख्या सांस्कृतिक नगरीत तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सुशिक्षित लोकं जास्त असून तसेच मतदार यादीत नावे असून सुद्धा मतदान करण्याच्या बाबतीत आपण मागे का राहतो.

अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदान करताना नोटा हे चिन्ह प्रेस करणा-या आणि मत न देणारे यांच्यात तसूभरही फरक नाही. कारण लोकशाही शासनपद्धतीत तसेच प्रजातांत्रिक राजनीतीत जर आपल्या दृष्टीने एकही योग्य उमेदवार आपल्या मतदार संघात नसेल तर पर्यायी जे सर्वोत्तम उपलब्ध उमेदवार आहेत त्यातील एकाचीच निवड आपल्याला करावी लागते. पण उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम उमेदवारांना झुगारुन आपण नोटा हा पर्याय अवलंबतो आणि याचा फायदा जे उपलब्ध आहेत पण सर्वोत्तम नाही आहेत अशा उमेदवारांना मिळतो. त्यामुळे नोटा या पर्यायाचा वापर शक्यतो करू नका आणि तुम्हाला योग्य वाटणा-या उमेदवारालाच तुमचं बहुमूल्य मत द्या.

मतदान करायच्या आधी तुम्हाला उपयोगी पडतील अशी महत्वाची माहिती इथे सांगितली आहे:-

  1. तुमचं नाव मतदार यादीत नोंदवा. जर अगोदरच नोंदवलेल असेल तर www.nvsp.in या वेबसाईट वर चेक करा किंवा 1950 या नंबर वर sms करा.
  1. लोकसभेत निवडून येणारे खासदार हे तुमच्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. तुमचे प्रश्न लोकसभेत मांडतात आणि तुमच्या हिताचे निर्णय घेतात. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण तसेच आधीच्या कामांची माहिती करून घेणं गरजेचं आहे.
  1. तुमच्या भागातल्या आत्ताच्या खासदारांची कामगिरी नीट बघा, संसदेतील हजेरी, निधीचा कसा वापर केला, कुठली bills मांडली, किती debate मध्ये सहभाग घेतला ही माहिती www.khasdar.info या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
  1. कोणत्या मतदान केंद्रावर तुमचं नाव आहे हे जाणून घेण्यासाठी ECIPS नंतर space देऊन तुमचा मतदार क्र. हे 1950 या नंबरवर sms करा.
  1. मतदानाला जाताना Voter ID सोबत ठेवा आणि जर Voter ID नसेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस किंवा पासपोर्ट ही सोबत नेऊ शकता.
  1. भारतीय लोकशाही ही संसदीय पद्धतीची आहे. त्यामुळे तुमचं मतदान पंतप्रधानांसाठी नसून ते खासदारासाठी आहे. तुमचं मत हे तुमच्या भागाचे आणि देशाचे भवितव्य ठरविणार आहे.
  1. तसेच मतदार यादीतल तुमचं नाव चेक करण्यासाठी तुम्ही ceo.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वर चेक करू शकता. तसेच जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही voter helpline हे ऍप Play store वरुन डाऊनलोड करून तुमचं नाव मतदार यादीत चेक करू शकता.
Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares