maskara (1)

मस्करा वापरण्याच्या टिप्स व ट्रिक्स…

स्वत:चा मेकअप करण्याची कला सरावानं आत्मसात करता येईल, त्यास फक्त विविध युक्त्यांची जोड द्यायला हवी. यामुळे, काम झटपट होतं आणि वेळही वाचतो. आपल्याला नट्टापट्टा करत तयार होण्यास लागणारी सरासरी वेळ पाहता, शक्य होईल तिथे वेळ वाचवणं आवश्यक आहे, असं तुम्हाला देखील मनोमन वाटत असेल; तर आज किमान मस्करा लावताना कुठल्या कल्पक युक्त्या वापरता येतील ते पाहूया. कारण, मस्करा लावणं वाटतं तितकं सोप्पं नाही ना!

  • काही ब्रॅण्ड्स मस्करा लावण्याचा ब्रश तिरकाच असतो, ज्यामुळे मस्करा लावणे सोप्पे जाते. ब्रश डोळ्याभोवतालच्या इतर त्वचेस लागत नाही. तुम्ही वापरत असलेल्या मस्क-याचा ब्रश तिरका नसेल, तर हातानेच त्याला हलकासा वाकवा. यामुळे, ब्रश आय लॅशेसवरुन सहज फिरवता येतो.
  • मस्करा क्वचित वापरल्याने, तो सुकतो व थोडा जाडसर होतो. अशावेळी, डोळ्यांना आराम देणारे व्हिसाईन (Visine) या आयड्रॉप्सचे दोन थेंब मस्क-यात मिसळावेत. यामुळे, मस्करा पुन्हा पुर्ववत होण्यास मदत होईल.
  • ब्रशवर एकाचवेळी भरपूर मस्करा येत असेल आणि त्यामुळे, डोळे बरबटत असतील. तर मेकअपच्या दुस-या एखाद्या ब्रशवर थोडासा मस्करा घेऊन तो आय लॅशेसवर फिरवावा. असे केल्याने, काम वाढीव होणार नाही.
  • मस्करा आय लॅशेसच्या दोन्ही बाजूने लावल्यास, आय लॅशेस जाडसर वाटतात व उठून दिसतात.
  • तसेच, मस्करा लावताना ब्रश आय लॅशेसशिवाय डोळ्यांच्या भोवताली लागू नये म्हणून, चमच्याची खोलगट बाजू डोळ्यांवर ठेवून मग मस्करा लावावा.
  • लावलेला मस्करा काढण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करता येईल. कापसावर खोबरेल तेलाचे काही थेंब घेऊन तो कापूस बंद डोळ्यांवरुन फिरवावा. तरी देखील, मस्करा न निघाल्यास वापरात नसलेला, पण स्वच्छ टूखब्रश ओला करुन तो हलक्या हाताने आयलॅशेसवरुन फिरवावा, मस्करा सहज निघतो.

यापुढे मस्करा वापरताना या टिप्स व ट्रिक्स पक्क्या लक्षात ठेवाल की नाही? ठेवायलाच हव्यात, आपल्याला कमीतकमी वेळात झक्कास तयार होऊन दाखवायचे असेल; तर चतुराईने झटपट मेकअप करायला शिकलेच पाहिजे.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares