RELAX SUNDAY (1)

माझा स्वत:साठीचा रविवार!

नोकरी घरकाम असा डोलारा सांभाळून थकलेल्या जीवाच्या वाट्याला आठवड्याअंती एक सुट्टी मिळते. तेव्हा, आनंदाचा, आरामाचा, बिनकामात, आळसात घालवावा असा सुखद रविवार किती जणींच्या वाट्याला येतो? फार क्विचित ना! उलट सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात, मग कामंही वाढतात. खवय्ये निराळी फर्माईश करतात. त्यात रोजच्या धावपळीत वेळ मिळत नाहीत अशी कामे डोक्यात फेर धरु लागतात. साफसफाईपासून ते नातेवाईकांना फोन करण्यापर्यंत सगळच असतं की यात, फक्त गैरहजर असते ती स्वत:! घरातील स्त्री…

इतरांसाठी कायमच करत आलोत, अधनं मधनं स्वत:साठीही थोडं राखून ठेवावं. फार अपेक्षा मुळीच नाहीत. किमान थोडी वेळ बाजूला ठेवावी. काही तास तरी मनासारखे जगावेत. कारण, थकल्यावर आराम करणं वेगळं आणि जागेपणी स्वत:ची आवडं अनुभवणं वेगळं. आपल्याला नेमकं हेच करायचंय. कुठल्याही सुट्टीच्या दिवशी हक्कानं काहितरी असं करायचं, जे स्वत:च्या आवडीचं असेल. उदाहरणार्थ, घरातल्यांच्या फेव्हरेट डिश नेहमीच बनवता. एकदा स्वत:च्या आवडीची डिश बनवा. कुणी आयतं करुन दिलं की छान वाटतंच, पण स्वत: स्वत:चे लाड पुरवण्यात पण भलतीच मज्जा आहे.

फार खर्च होतो म्हणंत, पार्लरला जाणं टाळणा-या अनेक मैत्रिणी आहेत. तसं न करता, शरीर सौंदर्य, सुंदर दिसणं याला महत्त्व द्यावा. खर्च टाळण्यासाठी कमीतकमी अशा नेमक्या सवयी लावून घ्यावेत. नियमित आयब्रोज, वॅक्सिंग, छानसा हेअर कट, फेशिअर वैगरे. निटनेटकं राहण्यामागचा मागचा हेतू कुणाला आकर्षित करण्याचा मुळीच नाही, तर स्वत:वर प्रेम करण्याचा आहे.

किमान एका कलेशी, छंदाशी मैत्री करणे अत्यावश्यकच. वाचन, गायन, नृत्य, योगा, चित्रकला, शिवणकाम, विणकाम, कात्रण जमवणं, चित्रपट पाहाणं, गाणी ऐकणं, जगाच्यापाठीवरची कुठल्याही प्रकारची आवड जोपसण्याचे वेड असतो. त्याचा विसर पडता कामा नये. हेच उद्योग आत्ममग्न होण्याची संधी देतात. मनात डोकावून पाहायला लावतात. मग वय कितीही होवो, मनाजवळ वृद्धत्व फिरकतही नाही.

मैत्रिणींचा ग्रुप असेल, तर स्ववेळ घालवण्याच्या मौजेत त्यांनाही सोबत घेता येईल. परिस्थिती सम असली, की विचारही बिनचूक जुळतात. भिशी, पिकनिक, सामाजिक कार्य, मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करण्याच्या निमित्ताने काही तास सख्यांसोबत घालवले, की नेहमीच्या वातावरणातूनही थोडी सवड मिळते. आणि कुणीच नसेल सोबतील तरी हरकत नाहीत. आपले एकटीनं आनंद लुटण्याचे भन्नाट पर्यायही आहेतच.

सततच्या राबत राहण्याने घराची वृद्धी तर होते, संसाराचे रहाट गाडगे सुरळीत सुरु राहते, नातीही छान जपली जातात. फक्त वाढ खुंटते ती घरातील ‘स्त्री’ची! तेव्हा यावर उपाय एकच नोकरी, घरकाम सांभाळताना स्वत:ला बिलकूल विसरायचं नाही. कुठल्याही सुट्टीच्या दिवशी मनपसंत अशी एकतरी आवड जोपासायची, अगदी हट्टानं!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares