RainyDay (1)

मान्सून शॉपिंग क्वीन!

ऋतू बदल झाला, की शॉपिंगसाठी हक्काचं कारण मिळतं! हेअर स्टाईलपासून, सॅण्डल्सपर्यंत सगळ्यातच ट्रेंडी पर्यायांची शोधाशोध सुरु होते. रोजच्या जगण्यात नवे रंग आले, की सहजच फ्रेश वाटू लागतं; त्यात पावसाळा, म्हणजे ख-या अर्थाने फ्रेश ऋतू! तुम्हालाही नव्या रंगांची संगत हवी असेल, तर लवकरच या पावसाळी वस्तूंची खरेदी करुन घ्या!

१. पावसाळ्यात मानाचे स्थान असणारी छत्री भरपूर पर्यायांमध्ये उपलब्ध असते. प्रत्येकीने जगावेगळी छत्री निवडण्याचा जणू चंगच बांधलेला असतो. ज्यामुळे, सर्वत्र भन्नाट आकार व रंगांचे मिक्समॅचिंग असणा-या छत्र्या दिसतात. आधी मुख्यत्वे सिनेमांमध्ये दिसणारी व काहीवर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीची ठरलेली पारदर्शक छत्री, तसेच रोज गर्दीतून प्रवास करणा-यांना फोल्डींगची छत्री उपयुक्त ठरते, तर लांब दांड्यांची छत्री त्यामानाने मजबूत असते.

२. शाळकरी मुलांसाठी रेनकोट मस्त पर्याय असला, तरी हल्ली तो रेनी फॅशनमधील महत्त्वाचा भाग झालाय. रेनी जॅकेट किंवा हाफ रेनकोट सारखे पर्याय महिलांसाठी उपलब्ध आहेत. रेनकोटमध्ये कोरडे रहाण्यासोबत जरा उबदारही वाटते व हातही मोकळे रहातात.

३. पावसाळी गमबूट्सनी फॅशनच्या दुनियेत नव्याने प्रवेश केलेला दिसतो, सोबत महिलांसाठी दिसायला नाजूक, रंगीत स्ट्राईप्सच्या डीझाईन्सचे भरपूर पर्याय आहेत. फक्त, बाजारात आलेल्या नवी स्टाईल तुमच्या नावे करण्यासाठी लवकरच खरेदीचा बेत आखायला हवा.

४. बॅकपॅकला रेनकोट जोडलेले असतेच त्यामुळे त्या सुरक्षित रहातात. मात्र, हॅण्डबॅग्ससोबत असे कुठलेही कव्हर मिळत नाही. म्हणूनच, साधरण दिसायला पारदर्शक प्लॅस्टिक हॅण्डबॅग सारखे असणारे हे वॉटरप्रुफ कव्हर विकत घ्यायलाच हवे. हॅण्डबॅग वापरणा-यांसाठी ही एक गरजेची वस्तू आहे.

५. चेह-यावरील नाजूक त्वचा पावसाच्या पाण्याने रुक्ष व खरखरीत होते. यासाठी योग्य क्रिमची निवड वेळीच व्हायला हवी. तसेच, मेकअप किटमधील नेहमीच्या आयलायनर, लिपस्टिकना रजा देत. वॉटरप्रुफ मेकअप वापरायला हवा. ज्यामुळे, चेहरा भिजल्यावरही तुमचा लूक छानच राहील.

मैत्रिणींनो, सुट्टी मिळताच वरील गोष्टींची खरेदी करुन घ्या. कारण, पावसाळ्यासोबत ग्राहकांची गर्दीही वाढेल. घाईगडबडीत झटपट निर्णय घेण्यापेक्षा, शॉपिंगची मजा घेत निवांत खरेदी करा व तुमचे मान्सून ट्रेंडी कलेक्शन तयार ठेवा.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares