kids

मुलांसाठी सुट्टीतले उद्योग!

एकदाची वार्षिक परीक्षा संपली, की मनात धरुन ठेवलेला गावाला जाण्याचा बेत पुरा करण्याची तयारी सुरु होते. गावाला गेल्यावर काय काय धम्माल करायची याचे मनसुबे मुलांसोबत घरातील मोठ्यांनीही रचलेले असतात. कधीचं बुकिंग करुन ठेवलेलं असतं, थोडी थोडी बॅगही भरुन झाल्याने, फक्त परीक्षा आटोपण्याचा अवकाश, की निघालो गावाला आणि हा प्लॅन नसला, तरी परीक्षा संपल्याने दिवसभर घरात असणा-या मुलांना खूष करण्याचे आईचे इतर प्लॅन तयार असतात.

काहीजणी मुलांसाठी त्यांच्या आवडीचा डबाभर खाऊ बनवतात. चवदार ट्रिट, छोटी मोठी पिकनिक, समर कॅम्प, छंद वर्ग वगैरे. यासोबतच यंदाच्या सुट्टीत मुलांना काही निराळं सरप्राईज द्यायचं असेल, तर पुढील धम्माल युक्त्या करुन पहाच.

1. सुट्टी म्हणजे, मुलं पूर्णवेळ घरीच आणि तुमचा मोबाईलही त्यांच्याच हाती. तेव्हा, मुलांनी तुमच्या मोबाईलमध्ये नवे गेम्स डाउनलोड करण्याआधी, तुम्हीच काही नव्या बोर्डगेम्सशी त्यांची ओळख करुन द्या. नवेकोरे गेम्स खरेदी करायचे म्हणजे थोडा खर्च होईल. पण, सुट्टीभर तुमचा मोबाईल जास्तीतजास्त वेळ तुमच्याजवळ राहील. काय पटतयं ना?

2. त्यांच्या सुट्टीत तुम्हालाही सहभागी व्हायचे असेल, तर जितके सुट्टीच दिवस तितक्या ३० ते ४० एक्टिव्हीटीजची यादी बनवा. एका चिठ्ठीवर एक एक्टिव्हीटी लिहा.

उदा.-

झाड लावावे.

समुद्रावर जाऊन किल्ला बनवावा.

घरी पिझ्झा बनवणे.

पक्ष्यांसाठी घरटे बनवावे.

अशा सगळ्या चिठ्ठ्या एका बरणीत भरा आणि रोज एक चिठ्ठी मुलांना काढायला सांगा. मुले खूष होतीलच, त्यांच्यासोबत टास्क पूर्ण करण्यात तुम्हालाही मज्जा येईल.

3. मुलं वर्षभर खेळतात, टिम्स पाडून मॅचेसही लावतात. पण, त्यांच्या खेळास थोडं मोठं स्वरुप दिलं तर? सध्या सगळ्यांच्यात आय.पी.एल.चा जोष संचारलाय, तेव्हा कॉलनीतील मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येईल. क्रिकेट, बॅटमिंटन, कॅरम, बुद्धीबळ अगदी ल्युडोसारख्या स्पर्धा खेळवून, विजेत्यांना बक्षिसे जाहिर केलीत तर मुलेही उत्साहाने सहभागी होतील.

या सा-यापलिकडे मुलांचा हसत खेळत वेळ जाईल असा आणखी एक भन्नाट उपाय आहे. झी मराठी घेऊन आलयं बच्चेकंपनीसाठी मासिक ‘खाली डोकं वर पाय’! मस्ती, दंगा एकाच ठिकाणी, बसल्याजागी, हटक्या पद्धतीने सुट्टीची मज्जा लुटायचा हा धम्माल पर्याय त्यांच्या हातात नक्की द्या व त्यांची सुट्टी मजेत जाईल याबाबत नि:शंक व्हा!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares