Mobile Care (1)

मोबाईलची काळजी घेताना!

व्यक्तिच्या जीवनातील मुलभूल घटकांत ज्याचा समावेश झाला असा ‘भ्रमणध्वनी’ प्रत्येकाचा जीव की प्राण! हल्ली मोबाईल नसलेला व्यक्ती, तर गटात न बसणा-या शब्दासारखा भासतो. विविध सुविधा पुरविणा-या या मोबाईलने अनेक कामे सोप्पी केली. पिढ्यांची बंधने न बाळगता पत्र व्यवहारात बालपण घालवलेल्या आजी – आजोबांनी देखील या मोबाईलला आपलेसे केले. या यंत्राला इंटरनेटची जोड मिळाली आणि संगणकावरील बरीचशी कामे चुटकीसरशी मोबाईलवर करणे सहज शक्य झाले. इतकी कामे केल्यावर हे यंत्र थोडे थकणारचं ना! मग, मोबाईल हॅंग होणे, बॅटरी लो दाखवणे, मेमरी फुल दाखवणे असे अनेक प्रकार सुरु होतात. यासाठी मोबाईलची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. ‘हल्ली सगळंच कामचलावु मिळतं’ असं म्हणंत आपणही दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवीन मोबाईल घेण्याचा भुर्दंडही आपल्यालाच बसतो. मोबाईल दिर्घ काळ कार्यरत राहावा असे वाटत असल्यास पुढील पर्याय तुम्हाला नक्की मदत करतील.

१. बॅटरी रिसेट
फोनमधील आवश्यक गोष्टींचा बॅकअप घ्यावा. फोन नंबर, फोटो, व्हिडीओ, महत्त्वाची ऍप्स, मॅसेजेस् आदिंच्या डेटाचा बॅकअप घेऊन ठेवावा. त्यानंतर, मोबाईलमधील ‘सेंटिंग्स’ या पर्यायातील ‘बॅकअप व रिसेट’ या पर्यायाच्या वापरातून मोबाईल अगदी नव्या फोन सारखा होतो. ह्या प्रोसेस नंतर फोन एकदा स्विच ऑफ होऊन पुन्हा सुरु होईल ही प्रोसेस सुरु असताना मोबाईलला कुठलीही नवीन कमांड देऊ नये.

२. मोबाईलची क्षमता
स्मार्ट फोन कितीही स्मार्ट असला तरी, त्याच्या क्षमतेला मर्यादा आहेत, त्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. फोटो, व्हिडीओ, ऍप्स, गेम्स यांचा भरणा न करता मोबाईलच्या क्षमतेनुसार योग्य त्या बाबींना फोनमध्ये स्थान द्यावे. मोबाईलची मेमरी वरचेवर रिकामी करावी. त्याचा बॅकअप इंटरनेट किंवा कॉमप्युटरवर घ्यावा. असे केल्याने, प्रोसेसिंगमध्ये अडथळा न येता तो सुरळीत कार्य करतो.

३. डाऊनलोडींग
मोबाईलमध्ये नवीन गोष्टी डाऊनलोड करताना अवैध्य साईट्स टाळाव्यात. असे केल्याने व्हायरसचा धोका कमी होतो व इतर ऍप्लिकेशन्सही सुरक्षित राहतात. यासाठी इंटरनेट सेटिंग्समध्ये असलेल्या ‘सिक्युरिटी’ या पर्यायाचा वापर करावा. असे केल्याने तुमचा स्मार्ट फोन स्वत:हून अवैध्य साईट्सना अटकाव करेल.

४. मोबाईलच्या कंपनीचा चार्जरंच वापरा
ज्या कंपनीचा तुमचा मोबाईल आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरण्यावर भर द्या. कुठल्याही कंपनीची नक्कल असलेला किंवा एखाद्या कंपनीच्या नावात फेरफार केलेल्या नावाचा चार्जर वापरल्यास मोबाईलच्या बॅटरीची गती कमी होऊन स्लो प्रोसेसिंगच्या समस्येला सामोरे जावे लागते.

वरील पर्याय तुमच्या मित्राची म्हणजेच, तुमच्या मोबाईलची कार्यप्रणाली दीर्घकाळ कार्यरत राहण्यासाठी मदत करतील. स्मार्टफोनला सतत स्मार्ट ठेवण्यासाठी तुम्ही घरच्याघरी त्याची अशी काळजी घेऊ शकता. ज्यामुळे, नवीन मोबाईल घेण्याचा अतिरिक्त खर्च टाळता येईल. अशाप्रकारे, तुम्ही बनू शकता तुमच्या मोबाईलचे डॉक्टर!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares