Bankinggg (1)

मोबाईल बॅंकींग या महत्त्वाच्या सुविधा देते!

घराचा डोलारा सांभाळताना आर्थिक गोष्टी महत्त्वपूर्ण असतात.

पैशांची जुळवाजुळव, खर्च,बचत अशा सगळ्या आर्थिक बाबींचे नियोजन आपल्यालाच करावे लागते . पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता दोन पाऊलं पुढे राहण्याची वेळ आली आहे. आधुनिकता स्वीकारायला आपण सुरुवात केली आहेच. आता जो व्यवहार घरगुती पद्धतीने करता येतो त्या गोष्टींना देखील आधुनिकता द्यायची हीच खरी वेळ आहे. त्यातलाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे mobile banking आहे.

मोबाईल जसा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग आहे त्याचप्रमाणे मोबाईल बँकिंग देखील आपल्याला नियमित उपयोगी पडू शकते. त्याबाबतीत आपण जागरूक होणं आणि ते आत्मसात करणं आवश्यक आहे.

बँकेतील व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून करता येण्याची सुविधा ‘मोबाईल बँकिंग’ म्हणून ओळखली जाते.

या सुविधेतून बहुतकरून अशा सुविधा आपल्याला मिळू शकतात.

1. मुख्य खात्यात केलेले शेवटचे तीन व्यवहार कळतात.

2. Account statement मागवता येते.

3. चेकच्या चालू स्थितीची चौकशी करता येते.

4. चेकचे payment stop करता येते.

5. Fixed deposit संबंधी चौकशी करता येते.

6. Bill Payment करता येते.

More Articles
Designed and Developed by SocioSquares