Mobile (1)

मोबाईल विकत घेताय, मग आधी हे वाचा!

एकवेळ अन्नाशिवाय दिवसभर राहू, पण मोबाईलशिवाय तासभर घालवणंही कठीण! हे यंत्र न वापरणारे क्वचितच सापडतील, कारण फोन करण्यापलिकडे आता बॅंक, ऑफिस किंवा बिलाचे पैसे भरण्यासारखी कामेही मोबाईल चुटकीसरशी करु लागलाय. त्याचा जास्त वापर केल्याने, तो तिकक्याच लवकर खराबही होतो आणि मग, पुन्हा एकदा स्मार्ट फोन खरेदीचा कार्यक्रम समोर उभा ठाकतो. ही फोन खरेदी स्मार्टली व्हावी, यासाठी पुढील टिप्स लक्षपूर्वक वाचा!

  • हल्ली ३००० रुपयांपासूनचे मोबाईल्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे, साधारण बजेट ठरवले, की त्यापुढे इतर आवश्यक फिचर्सची यादी बनवता येते.
  • फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीमचाही विचार करणे गरजेचे आहे. फोन सतत चार्ज करावा लागू नये. यासाठी दिर्घकाळ टिकणारी बॅटरी मोबाईलमध्ये हवी. ही गरज चांगली ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण करु शकेल.
  • कार्डच्या मदतीने काही फोन्समध्ये १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येत असली, तरी काही अॅप्लिकेशन्स फक्त फोन मेमरीमध्येच सेव्ह होत असल्याने फोनची मुख्य मेमरी किमान ३ ते ४ जीबी असावी.
  • फोन विकत घेतानाच रॅम व प्रोसेसरचा विचार करावा लागतो. कारण, एक्सटर्नल मेमरीप्रमाणे रॅम व प्रोसेसर नंतर वाढवता येत नाहीत. मुख्यत्वे, गेमिंग किंवा तत्सम अधिक जागा व्यापणा-या अॅप्लिकेशन्ससाठी रॅम व प्रोसेसर जास्त क्षमतेचे असणे गरजेचे आहेत.
  • इंटरनेटच्या कुटुंबातून २जी हळूहळू बाद होत असून, त्याहून वेगवानसे ३जी व ४जी कनेक्ट होऊ शकतील, अशाच मोबाईलचा सध्या विचार करायला हवा.
  • मोठ्या स्क्रीनच्या मोबाईन्सना सध्या पसंती मिळत असून, ५ इंचाच्या स्क्रीनला मोठी मागणी आहे. मोठ्या स्क्रिनवर फोटेज, व्हिडीओज देखील छान दिसतात. असा दुहेरी फायदा साधता येतो.
  • जितका महागडा मोबाईल, तितका चांगला कॅमेराही त्याला असणार हे नक्की! पण, हल्ली काही कॅमेरा स्पेशल मोबाईलही उपलब्ध आहेत. ज्यामध्ये, इतर फिचर्सच्या तुलनेत मोबाईलला जास्त महत्त्व दिले आहे.
  • विशिष्ट ब्रॅंड्सचे मोबाईल आवडत असल्यास त्यानुसार, मोबाईलची निवड करणे अधिक सोप्पे जाईल. शक्यतो नामांकित कंपन्याचा फोन खरेदी करण्यावर भर द्यावा. अशा कंपन्यांची वस्तू दुरुस्तीबाबतची सेवा फायदेशीर असते. फोनचा लूकही ट्रेंडी असतो.

नवाकोरा मोबाईल विकत घ्यायचा, तर असा गृहपाठ करुन जायलाच हवे. तरच, बजेटमध्ये बसणारा व आवश्यक ते सर्व फिचर्स असलेला मोबाईल विकत घेणे शक्य होईल. दुकानदार एखाद्या मोबाईलची खोटी स्तुती करीत तुमच्या गळ्यात मारणार नाही व वस्तूबाबत कुठलीही फसवणूक होणार नाही.

More Articles
Designed and Developed by SocioSquares