healthy habits (1)

‘या’ ५ सवयी तुम्हाला ठेवतील फिट!

नोकरदार वर्ग म्हटलं, की त्यांचे आठवड्याचे वेळापत्रक ठरलेले! रोजच्या व्यस्त दिनक्रमातून डाएट करण्यासाठी किंवा जीमला जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मान मोडून ऑफीसमध्ये कामं केल्यावर आठवड्याच्या अंती मिळालेली सुट्टी आळसात व आरामात जाणारचं. त्यादिवशी तर डाएट व व्यायामाचे नाल न काढणेच बरे! म्हणून, अशा यांत्रिक जीवनशैलीतून आरोग्य जपणारा एक हलका फुलका उपाय शोधून काढलाय ज्यामध्ये फक्त ५ सवयींचा समावेश आहे.

१. किमान ७ ते ८ तास झोप घ्यावी!

थकल्या शरीराचे व मनाचे स्वास्थ्य निरोगी रहावे, यासाठी ७ ते ८ तासांची गाढ व शांत झोप घेणे आवश्यक आहे. अपु-या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे. तसेच मधुमेह व ह्दयविकाराचा त्रास बळावू शकतो.

 

२.योग्य प्रमाणात पाणी प्या!

पाण्याचे शरीरातील प्रमाण संतुलित असायला हवे, नाहीतर दम लागणे, थकवा येणे, निरुत्साही वाटण्याची लक्षणे दिसू लागतात. हे टाळण्यासाठी दिवसभरात साधारण चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

 

३. पौष्टिक आहार घेण्यावर भर द्या!

फास्ट फूड चटकदार असले, तरी पौष्टिक नक्कीच नसते. यासाठी दिवसातून एकदातरी पूर्ण अन्न (भाजी, चपाती, भात, वरण, मांस-मच्छी इ.सोयीनुसार) घेणे अत्यावश्यक आहे. सर्व प्रकारची फळे नियमित सेवन करायला हवीत.

 

४. स्वत:ची इतरांशी तुलना करु नका!

शारीरिक आरोग्यरक्षक अशा वरील तीन सवयींसोबत, निकोप मनासाठी गरजेचे आहेत सकारात्मक विचार! समवयस्क नातेवाईक किंवा मित्रमंडळींशी स्वत:ची तुलना करुन स्व-व्यक्तिमत्त्वास गौण ठरवण्याची चूक करु नये; उलट स्वत:जवळील कला कौशल्यांना अधिक वाव द्यावा.

 

५. हसत, खेळत, आनंदी रहा!

सतत चिंतातुर राहील्यास शरीर निरोगी असूनही मनाची अस्थिरता त्रस्त करते. मानसिक संतुलन अधिकाधिक नकारात्मक होऊन, सततची चिडचिड, नैराश्य अशा समस्या सतावू लागतात. यासाठी, कामातून थोडा वेळ काढून कुटुंबासोबत फिरायला जाणे, मित्रमंडळींच्या गाठीभेटी, आवडीची कलाकुसर, छंद असे मनाला प्रसन्नता देणारे उद्योग करायला हवेत.

काय मग मैत्रिणींनो, या पाच सवयींना रोजच्या वेळापत्रकात स्थान देणार ना? कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये,

More Articles
Designed and Developed by SocioSquares