Ganesh (2)

बाप्पासाठी इकोफ्रेंडली सजावट!

गणेशोत्सवाचे वेध लागलेत, मनामनात सुरुय पाहुण्याच्या स्वागताची तयारी! गणेश मूर्ती आकार घेतेयं, ढोल पथकांचं बुकींग होतयं, मखर, हार तु-यांनी बाजारही रंगलेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत घरोघरी ‘सुट्टी म्हणजे साफसफाई’ हे समीकरण झालयं व आम्ही घेऊन आलोय “गौरी गणपतीसाठी सजावट काय करावी…..?” या तुमच्या मनातील प्रश्नाचं इकोफ्रेंडली उत्तर!

रांगोळी –
अनेक रंग व आकारांचे पर्याय वापरुन दर दिवशी नवं डिझाईन करण्याची मुभा फक्त रांगोळीच देते. ठिपक्यांची किंवा संस्कार भारती, कुठलीही रांगोळी सणाला खरी शोभा आणते. जमेल तशी रांगोळी काढावी. पांढ-या नक्षीदार वळणांत रंग भरले, की सजावट हमखास उठून दिसते. मूर्तीच्या चौरंगाभोवती, दाराबाहेर, पाय-यांवर रोज एक नवी रांगोळी काढता येईल.

फुले –
सणाच्या दिवसांत फुलांचे भाव वधारतात. फुलांच्या डेकोरेशनची ऑर्डर देणे अगदीच बजेटबाहेर जाते. यावर उपाय म्हणजे फुलांची होलसेल खरेदी करता येईल. ६ ते ७ दिवसांसाठी लागणारी फुले एकदाच विकत घ्यावीत. याच फुलांचा वापर करुन, हवे तेव्हा हार, माळा, फुलांची रांगोळी अशी सजावट करता येईल. उरलेली फुले फ्रिजमध्ये साठवून ठेवता येतील व पुन्हा दोन दिवसांनी फुलांची नवीन सजावट करता येईल.
ऑएसीस म्हणजे फुले खोचण्यासाठी वापरला जाणारा हिरवा स्पंज बाजारातून विकत आणून, त्यावर देशी विदेशी फुले खोचून हवी तशी फुलांची सजावट मूर्तीभोवती मांडता येईल.

देखावा किंवा थीम-
सार्वजनिक गणेश मंडळे नेहमीच मूर्तीच्या भोवताली भव्य देखावा उभारतात. ही सजावट भरपूर खर्चीक असते, पण घरातील लहानश्या मूर्तीसाठी टाकाऊतून टिकाऊ अशी इको फ्रेंडली थीम निवडू शकता.
गणपती भोवती पुठ्याची कमान बनवता येईल. त्यावर क्रेपची रंगीत फुले चिटकवता येतील. फक्त दोन रंगातील कॉम्बिनेशन निवडावे. ते अधिक उठून दिसते. क्राफ्ट किंवा लोकरीपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंचा आकर्षक वापर करता येईल. थीमनुसार कार्डबोर्डवर विविध चित्रे रेखाटून त्याचे कटवर्क करुन वापरु शकता. अशा रंगरंगोटीच्या कामात लहान मुलांचाही हातभार लागतो व तेही खूष होतात.

Decoration (1)

ज्यामध्ये काचेच्या बाटल्यांचा वापर करुन तयार केलेला मखर तुम्हाला दिसेल. तसेच, रंगीत कागदांपासून तयार केलेल्या पानाफुलांचा देखावाही करता येईल. क्राफ्ट प्रकारातल्या क्विलिंगचा वापर करायलाही हरकत नाही.

Decoration (2)

तुम्हाला सजावट करणे सोप्पे जावे, म्हणून काही इकोफ्रेंडली कल्पना उदाहरणादाखल दिल्या आहेत. प्लॅस्टिक किंवा थर्माकॉलचा वापर करुन डेकोरेशन करणे शक्यतो टाळावे. बाजारात आयते मिळणारे शोभिवंत थम्राकॉलचे मखर, निर्सगाची शोभा कमी करतायेत हे ध्यानात घेऊया. वापरण्यास सोयीस्कर असणारे प्लॅस्टिक किंवा थर्माकॉल विघटीत होत नाहीत. त्यांची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ करणा-या घटकांमध्ये प्लस्टिक व थर्माकॉल हे प्रमुख स्थानावर आहेत. तेव्हा, पर्यावरदायी सजावटातून आनंद घेऊन येणा-या बाप्पालाही आनंदी करुया!

बाप्पाला पूजती मनोभावे| निसर्गप्रेमी भक्तगणहे ||

Source:Pinterest

More Articles
Designed and Developed by SocioSquares