yogkriya (1)

‘योगा’ की ‘व्यायाम’ काय निवडावे घ्या जाणून!

‘योगा’ व ‘व्यायाम’ निरोगी आरोग्य देणारे हे दोन्ही प्रकार परस्परांहून फार भिन्न आहेत, तसेच त्यांचे शरीराला होणारे फायदेही! चालणे, धावणे, पोहणे, दोरीउड्या, सायकलिंग, विविध खेळ किंवा टप्प्याटप्प्याने केले जाणारे व्यायाम प्रकार या सा-यास आपण ‘एक्सरसाईज’ किंवा ‘व्यायाम’ असे म्हणतो, तर योगासने स्थिर एकाजागी बसून केली जातात. पाठ, पोट, मणका व शरीरातील मांसपेशींनाही ठरावीक स्थितीत ठेवून, आसनांद्वारे दाब व ताणाची क्रिया केली जाते. येथे सावकाश, दीर्घ, आवाज न करता चालणारा श्वासोच्छवास अपेक्षित असतो. स्थिर योगासनांच्या माध्यमांतून अवयवांपर्यंत रक्त पुरवठा पोहोचवला जातो. तुलनेने, व्यायामात शरीराची खूप हालचाल होते. ह्दय, फुप्फुसे यांचे काम वाढते. व्यायाम करुन थकलेल्या मांसपेशींना अधिक रक्त पुरवठा केला जातो.

शरीर दणकट व मजबूत करणारा व्यायाम केल्याने, शरीराची भरपूर हालचाल होते व कडकडून भूक लागते. जीममध्ये जाणा-यांनी जीमची कसरत सतत सुरु ठेवणे गरजेचे असते, नाहीतर शरीर पूर्ववत होऊ लागते. अशाप्रकारे, शरीराला मेहनत व नियमिततेची शिस्त लावण्यासाठी ‘व्यायाम’ उपयुक्त ठरतो. तर योगाद्वारे, एकाग्रता व मन:शांती वाढण्यास मदत होते, ह्द्य व फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, पचनक्रिया सुधारते, शरीर लवचिक व मऊ होण्यास मदत होते. ते शरीरासाठी आवश्यक असणारी आहाराची पातळी संतुलित राखतात, रोगप्रतिकार क्षमता वाढवितात, इथेही नियमितता हवी. योगा सुरु केल्यानंतर तो वर्षानुवर्षे करत रहाणे अत्यावश्यक आहे.

शरीरासाठी दोन्हीही लाभदायी आहेत मात्र, व्यायामाचे फायदे व्यायाम केल्यानेच मिळतात व योगाचे योगाद्वारेच! यापैकी तुमच्यासाठी योग्य असणारा पर्याय निवडताना दैनंदिन वेळापत्रक, वय, आरोग्याची गरज, आहाराचा प्रकार या बाबींचा विचार करावा व डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares