sabuu (1)

रेसिपी – उपवासाचे थालीपीठ

नवरात्रीचे उपवास सुरु झालेत. काही भक्तगण देवी उठता बसता, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी उपवास करतात किंवा काही जण सलग नऊ दिवस देखील उपवास करतात. अशावेळी उपवासाचा फराळ करताना नेहमीच्या पारंपारिक पदार्थांपेक्षा काही निराळ करुन पहा यंदा! जसं की साबुदाण्याचे थालीपीठ…..

साहित्य – २ वाट्या भिजवलेला साबुदाणा, २ उकडवलेले बटाटे, १/२ वाटी शेंगदाणा कूट, ६ ते ७ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा लिंबू रस, जिरेपूड, मीठ, तूप

पाककृती – भिजवलेल्या साबुदाण्यांमधून पाणी विलग करावेत, नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करावेत आणि बारीक केलेले मिरच्यांचे तुकडे, शेंगदाण्याचा कूट, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ हे जिन्नस देखील त्यामध्ये घालावेत. सर्वं मिश्रण हातानेच छान एकजीव करुन घ्यावं. आता, तयार मिश्रणाचे थालीपीठ थापून घ्यावे. थालीपीठाला मध्यभागी तूप सोडण्यासाठी हलकेच भोक पाडावे. आता, नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यावे आणि दही वा मिरचीच्या ठेच्यासोबत गरमागरम सर्व्ह करावेत.

कशी वाटली रेसिपी? जरुर कळवा तुमच्याजवळ काही निराळी आणखी स्वादिष्ट फराळी रेसिपी असल्यास ती जरुर शेअर करा खालील कमेन्ट बॉक्समध्ये! रेसिपी लिहिताना प्रमाण अचूक नोंदवण्यास विसरु नका. तुम्ही सांगितलेली रेसिपी आम्ही जागृतीच्या मैत्रिणींसोबत शेअर त्याची एक खास पोस्ट तयार करुन. अर्थाच तुमच्या नावच्या नोंदिसहित!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares