mutton chops banner

रेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स

साहित्य – १० मटण चॉप्स, ६ हिरव्या वेलच्या, २ चमचे बडीशेप, ५ लवंगा, २ दालचिनीचे मध्यम आकारातील तुकडे, ४ कप दूध, १/२ वाटी बेसन, १/४ वाटी मिरपूड, १/२ चमचा हिंग, १ लिंबाचा रस, १/२ कप तूप

पाककृती –

  • वेलची, लवंग, दालचिनी व बडीशेप एकत्र कापडामध्ये बांधून त्याची पुरचुंडी करावी.
  • मोठ्या पसरट पाचेल्यात चॉप्स घालून त्यामध्ये दूध, अर्धा लीटर पाणी व मसाल्याची पुरचुंडी घालून साधारण ४० मिनिटे पाणी आटेपर्यंत शिजवत ठेवावेत.
  • बेसन व तांदळाचे पीठ व थोडे पाणी घालून भज्यांच्या पिठासारखे एकजीव करुन घ्यावे. त्यामध्ये मीठ, मिरचीपूड, हिंग घालून मिश्रण नीट फेटून घ्यावे.
  • शिजलेले मटण चॉप्स जरा थंड होऊ द्यावेत.
  • कढईत तूप तापवून घ्यावे. शिजवून घेतलेले चॉप्स पिठात घोळवून तूपावर छान तळून घ्यावेत.
  • अशाप्रकारे, तयार झालेले काश्मिरी मटण चॉप्स चटणी किंवा सॉससोबत गरमागरम सर्व्ह करावेत.

झणझणीत व स्वादिष्ट काश्मिरी मटण चॉप्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते नक्की लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये….

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares