KKURKURE (1)

रेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स

साहित्य – ४ उकडलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, १ वाटी उकडलेले मटार, १ वाटी चिरलेले गाजर, १ वाटी चिरलेली फरसबी, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, ३ चमचे किसलेले चीज, ३ चमचे कॉर्नफ्लॉवर, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पावडर, १/४ चमचा काळीमिरी पावडर, /२ चमचा आमचुर पावडर, १/२ चमचा चाट मसाला,  कॉर्नफ्लेक्सचा चुरा, तेल, मीठ, स्टिक.

पाककृती –

  1. प्रथम एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यामध्ये, वाफवून घेतलेले मटार दाणेही कुस्करावेत.
  2. नंतर, यामध्ये चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, फरसबी, कोथिंबीर व किसलेले चीज घालून सर्व जिन्नस एकमेकांत नीट मिसळून घ्यावेत.
  3. आता, त्यात आले लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, धणे पूड, आमचूर पावडर, चाट मसाला, काळीमिरी पूड, मीठ, कॉर्नफ्लॉवर घालून मिश्रण पुन्हा एकदा नीट एकजीव करुन घ्यावे.
  4. तयार झालेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन घ्यावेत.
  5. हे गोळे कॉर्नफ्लेक्सच्या चु-यात घोळवावेत व तेलात छान कुरकुरीत तळून घ्यावेत.
  6. तयार झालेले लॉलीपॉप्स चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करावेत.

Image source-https://goo.gl/cfavQJ

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares