Kairi Dal BANNER

रेसिपी – कैरीची डाळ

 

साहित्य:- कैरी, वाटीभर हरभरा(चणा) डाळ, तिखट मिर्च्या, मीठ, जिरे, साखर, फोड़णीसाठी मोहरी, हिंग आणि हळद

कृती:- कैरीची डाळ बनवण्याच्या आदल्या दिवशी हरभरा डाळ(चणा डाळ) रात्री भिजत घालावी. दुस-या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून तसेच उपसून ठेवावी. नंतर त्यात चवीप्रमाणे हिरवी मिर्ची, मीठ, थोड़ी साखर, जिरे व कैरी घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावी आणि मग त्यानंतर त्यालातेलाची फोड़णी दयावी. तेलाची फोड़णी देत असताना तेलात मोहरी, हिंग तसेच हळद घालावे आणि ती फोड़णी डाळीवर घालून ते मिश्रण ढवळून घ्यावे. अशा रीतीने चैत्र महिन्यात ते सुद्धा चैत्रागौरीच्या हळदी-कुंकू समारंभात हमखास बनवली जाणारी खमंग अशी कैरीची डाळ खाण्यास तयार…

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares