prawns rice banner

रेसिपी कोळंबी भात

साहित्य-

अर्धा किलो सोललेली कोळंबी, अर्धा किलो तांदूळ, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ चमचा लाल तिखट, २ नारळाचे दूध, पाऊण वाटी तेल, २ मोठे दालचिनिचे तुकडे, ३-४ लवंगा, ३ हिरवे वेलदोडे, अर्धा चमचा शहाजिरे, २ चमालपत्राची पाने, चवीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला, १ चमचा बडीशेप, १ लहान चमचा जिरेपूड, १ चमचा हळद

पाककृती-

  • प्रथम कोळंबी स्वच्छ धुवून, त्यास हळद व मीठ लावून ठेवावे. तांदूळ धुवून चाळणीत त्यातील पाणी निथळत ठेवावे. दोन नारळ वाटून त्याचे दूध काढून घ्यावे.
  • आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये तमालपत्रे, दालचिनी, हिरवे वेलदोडे व शहाजिरे घालावे.
  • त्यावर मीठ लावून ठेवलेली कोलंबी व वाटलेले आले, लसूण परतून घ्यावे. हळद, गरम मसाला, तिखट व पाणी निथळून घेतलेले तांदूळ त्यामध्ये घालून नीट परतून घ्यावेत.
  • वरील मिश्रणात आता नारळाचे दूध मिसळावे व आवश्यक वाटल्यास त्यामध्ये १ भांडे पाणी घालावे. चवीनूसार तयार मिश्रणात मीठ घालून खिचडी मंद आचेवर शिजू द्यावी.
  • कोलंबीची भात तयार झाल्यावर वरुन चिरलेली कोथिंबीर व साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावी.

 

वरील रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा व तुमच्याजवळील चवदार नॉनव्हेज रेसपीज देखील नक्की शेअर करा खालील कमेन्टबॉक्समध्ये…

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares