gARLIC BREAD (1)

रेसिपी – गार्लिक ब्रेड

साहित्य –

१ मोठा ब्रेड(बगीट/मोठा स्लाईज ब्रेड), १२५ ग्रॅम बटर, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १० ते १२ पुदीन्याची पाने किंवा मिक्स हर्ब

पाककृती –

एका भांड्यात बटर, बारीक चिरलेला लसूण व मिक्स हर्ब एकत्र करुन घ्यावे.

ब्रेडच्या स्लाईजवर वरील मिश्रण नीट पसरावे.

ब्रेड पुन्हा फॉइलमध्ये गुंडाळून बेकिंग ट्रेमध्ये ठेवावेत.

४००F/२००C प्रिहीटेड ओव्हनमध्ये ट्रे ठेवून, साधारण ५ मिनिटे ब्रेड बेक करुन घ्यावा.

आता, तयार झालेल्या कुरकुरीत गार्लिक ब्रेड पुदीन्यांच्या पानांनी गार्निश करुन सर्व्ह करावा.

इतकी साधी व सोप्पी रेसिपी, ब्रेकफास्टसाठी करावेत असे खुसखुशीत गार्लिक ब्रेड! बच्चेकंपनीला असे चटकदार पदार्थ नेहमीच आवडतात, पण हे ब्रेड्स मोठ्यांनाही नक्की आवडतील. तेव्हा नक्की करुन पाहा व कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares