Gulkand Puranpoli Banner

रेसिपी – गुलकंद पुरणपोळी

साहित्य:- एक वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 1 वाटी चणा डाळ, एक वाटी गूळ, पाव वाटी गुलकंद.

कृती:-  सर्वप्रथम चणा डाळ ८-१० तास पाण्यात भिजत ठेवायची. मग कुकरमध्ये ठेवून बारीक गॅसवर ५-६ शिट्ट्या होऊ द्याव्या.. मग डाळ व्यवस्थित शिजते आणि मग कुकर दबल्यावर म्हणजे पूर्ण वाफ निघून गेल्यावर झाकण उघडून डाळ बाहेर काढून घ्यावी.

मग त्या डाळीतले पूर्ण पाणी काढून घ्यावे. मग Smasher ने डाळ smash करून घ्यावी. मग १ वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ याप्रमाणे मिश्रण करून ते एका कढईत काढून घ्यावे. मग गॅस चालू करून हे मिश्रण ढवळत रहावे. सुरुवातीला ३-४ मिनिटं ढवळल्यावर ते मिश्रण पातळसर होईल. मग हे मिश्रण अजून १५-२० मिनिटं बारीक गॅसवर ढवळत रहावे. पुरण घट्टसर झाले की गॅस बंद करावा. पुरण थंड झाल्यावर त्यात गुलकंद घालावा. पोळी साठी १ वाटी गव्हाचं पीठ, १ वाटी मैदयाच पीठ, किंचित मीठ आणि रंग येण्यासाठी हळदीऐवजी मी १ वाटी पाण्यात केशराच्या काडया घालून ठेवाव्यात. त्याने छान रंग तर येतोच पण चव पण मस्त येते. कारण हळदीने चव येत नाही, नुसताच रंग येतो. एवढया पिठासाठी साधारण दीड वाटी पाणी घ्यावे. सैल कणीक मळून झाली की , किमान १ तास झाकून ठेवावी. या एक तासात पुरण बनवावे आणि एक तासाने मग कणीक परत तेल लावून एकसारखी करून घ्यावी. त्या कणकेचे लहान लहान गोळे करून त्यात गुलकंद मिश्रीत पुरण घालून गोल पोळी लाटावी. पोळी लाटून झाली की तव्यावर मंद आचेवर भाजावी आणि त्यावर तूप घालून गरमागरम गुलकंद पुरणपोळी सर्व्ह करावी.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares