chana chilli banner

रेसिपी – चना चिली

साहित्य–
१ कप चणे(रात्रभर भिजत घालावेत), १ लसूण गड्डा, १ मोठा कांदा, २ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ कांद्याच्या पाती, ४ चमचे टॉमेटो सॉस, ४ चमचे रेड चिली सॉस, ३ चमचे सोया सॉस, ३ चमचे व्हिनेगर, २ चमचे काळीमिरी पावडर, ४ ते ५ चमचे कॉर्नफ्लॉवर, मीठ, तेल

पाककृती –

  • रात्रभर भिजवून घेतलेले चणे, कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. (चणे संपूर्ण मऊसूद शिजवू नयेत.) शिजवलेल्या चण्यातील पाणी निथळून द्यावे. त्यामध्ये एक लहान चमचा काळीमिरी व मीठ घालून नीट घलवून घ्यावे. आता, त्यात कॉर्नफ्लॉवर घालावा व सर्व चण्यांना कॉर्नफ्लॉवर समसमान लागेल याची काळजी घ्यावी.
  • कढईत तेल गरम करुन थोडे थोडे चणे तळून घ्यावेत.(चणे फुटून तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्यम आचेवर चणे तळून घ्यावेत.) चणे तळून झाल्यावर गार होण्यास बाजूला सारुन ठेवावेत.
  • आता, कढईत ३ ते ४ चमचे तेल गरम करुन बारीक चिरेलला लसून परतून घ्यावा.
  • यामध्ये चिरलेला कांदा टाकून पुन्हा परतून घ्यावे. आता, त्यात चिरलेली शिमला मिरची व पातीकांदा (कांद्यासहित) टाकून छान परतून घ्यावा.
  • नंतर, यात उभ्या चिरलेल्या मिरच्या व सोया सॉस, टॉमेटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, जराशी मिरीपूड घालून सर्व मिश्रण नीट एकजीव होईस्तोवर परतावे.
  • तयार मिश्रणात, तळून घेतलेले चणे घालावेत व मंद आचेवर सर्व मिश्रण नीट ढवळून घ्यावे. आता, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालावे व कढईवर झाकण देईन गॅस बंद करावा.
  • अशी तयार डीश गरमा गरम सर्व्ह करावी. फ्राईड राईस किंवा अगदी जिरा राईस सोबतही तोंडी लावायला उत्तम ठरणारी ‘चना चिली’ नक्की ट्राय करुन पाहा व आठवणीने कळवा प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये,
Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares