CHIROTE (1)

रेसिपी – चिरोटे

यंदाच्या दिवाळीत घरोघरी बनायलाच हवी, अशी चविष्ट गोडाची रेसिपी!

साहित्य – १/३ कप मैदा १/४ कप रवा, कॉर्नफ्लॉवर, तूप, पाणी,

पाककृती – प्रथम एका भांड्यात मैदा घेऊ त्यामध्ये रवा व दोन ते तीन चमचे गरम तूप मिसळावे. मिश्रण पाण्याच्या सहाय्याने नीट मळून घ्यावे. त्यानंतर, १० ते १५ मिनिटे ते तसेच झाकून ठेवावे.

त्यानंतर, चिरोट्यांना आतील बाजूने लावण्यासाठी साठा तयार करावा. त्यासाठी दुस-या भांड्यात दोन टे.स्पू. तूप घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्यावे. त्यामध्ये, कॉर्नफ्लॉवर मिसळावा. मिश्रण फार घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी व बाजूला ठेवून द्यावे.

तयार केलेल्या मैदा व रव्याच्या मिश्रणाची पोळी लाटून घ्यावी. त्यावर तयार साठा लावावा. त्यावर आणखी एक पोळी पसरावी. त्यावर पुन्हा एकदा साठा लावावा व वरुन तिसरी पोळी त्यावर पसरावी व पुन्हा एकदा त्यावर साठा लावावा.

अशाप्रकारे, एकावरएक एकूण तीन पोळ्या रचल्यानंतर त्या नीट दुमडत जाव्यात व त्यांचा रोल तयार करावा. दोन्ही बाजूंनी रोल नीट बंद करावा. ह्या रोलचे लहान लहान तुकडे करावेत. तयार केलेली लाट्या हलक्या हाताने लाटून घ्याव्यात व तुपामध्ये खमंग तळावेत.

तयार झालेले चिरोटे पिठी साखरेत घोळवून घ्यावेत. त्यावर आवडीनुसार सुकामेवा बारीक चिरुन त्याने चिरोटे गार्निश करावेत.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares