Chocolate Modak banner

रेसिपी – चॉकलेट मोदक

साहित्य – १/४ कप खवा, २ टि.स्पू. पिठी साखर, २ टि.स्पू. कोको पावडर

पाककृती – खवा दीड मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये साधारण तपकिरी रंगाचा होईस्तोवर गरम करुन घ्यावा. या दीड मिनिटात दर १५ सेकंदानी खवा ढवळून पुन्हा मायक्रोव्हेवमध्ये ठेवावा. असे केल्याने, संपूर्ण खवा नीट तपकिरी होईल.

खवा थोडा निवळला, की त्यामध्ये पिठी साखर घालून मिश्रण नीट ढवळून घ्यावे. त्यानंतर, यामध्ये २ टि.स्पू. कोको पावडर घालावी.

मिश्रण नीट ढवळून घ्यावे व घट्ट झाले की मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.

चॉकलेट मोदक करताना तुम्ही मिल्क चॉकलेटसुद्धा वापरु शकता. मायक्रोव्हेव ऐवजी नॉनस्टीक कढईतही खवा गरम करता येईल.

Image Source: https://goo.gl/nydwse

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares