Papad roll (1)

रेसिपी – पापड रोल

साहित्य: उडदाचे पापड, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ वाटी उकडलेले मटारदाणे, १/२ वाटी खवणलेला नारळ, १/२ वाटी बारीक शेव, काजू व बेदाणे, ४ ते ५ हिरव्या मिरच्यांचे वाटण, एका लिंबाचा रस, साखर, मीठ, तळण्यासाठी तेल

पाककृती: प्रथम उकडलेले मटारदाणे थोडे कुस्ककरुन त्यामध्ये पापडाचा चुरा टाकावा. आता वरील इतर सर्व जिन्नस छान एकजीव करुन घ्यावेत. त्या सारणाचे समान सहा भाग करावेत.

त्यानंतर, एका ताटात पाणी घेऊन त्यात सहा पापड साधारण ३ ते ४ मिनिटे भिजवत ठेवावेत.

मग, प्रत्येक पापड थोडावेळ निथळत ठेवावा. कोरड्या फडक्याने टिपून घ्यावा.

आता सहा भागांत विभागलेल्या सारणापैकी  एक भाग, एका पापडावर ठेवून त्याची वळकटी करावी. तो पापड दोन्ही बाजू, सारण बाहेर पडू नये यासाठी पाण्याच्या सहाय्याने दुमडूून बंद कराव्यात.

सर्व रोल सारण भरुन तयार होताच, तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत.

अशाप्रकारे, तयार झालेले पापड रोल्स गरमागरमच चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करावेत.

PC:https://goo.gl/qtb78A

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares