pizza muffins banner

रेसिपी – पिझ्झा मफिन्स

साहित्य:

५० ग्रॅ. बटर, ५० ग्रॅ. ऑलिव्ह ऑईल, २ अंडी, १ कप दूध, २ टे.स्पू. टॉमेटो केचअप, २ कप मैदा, १ टिस्पू. बेकिंग पावडर, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो, कॉर्नचे दाणे, १ टे.स्पू. साखर, मीठ, किसलेला चीज

 

पाककृती:

प्रथम एका बाऊलमध्ये बटर व ऑलिव्ह ऑईल एकत्र फेटून एकजीव करुन घ्यावे. नंतर त्यामध्ये २ अंडी पिवळ्या बलकसहित मिसळावीत तेही नीट फेटून घेतल्यावर, त्यात १ कप दूध हळूहळू मिसळत मिश्रण ढवळत रहावे.

आता त्यामध्ये टॉमेटो केचअप मिसळून मिश्रण बाजूला ठेवावे.

त्यानंतर, मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे. ज्यामुळे, हे दोन्ही जिन्नसांत गुठळ्या रहाणार नाही व ते छान एकजीव होतील. आता यामध्ये चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली शिमला मिरची व टोमॅटो तसेच कॉर्नचे दाणे घालावेत. आवडीनुसार कुठल्याही फळभाज्या घेऊ शकता. याच मिश्रणात साखर, मीठ, थोडे किसलेले चीज घालावे. आता सर्व जिन्नसांत तयार केलेले बटर व अंड्याचे मिश्रण घालावे. सर्व नीट एकजीव केल्यावर मफिन्सच्या साच्यात थोडे थोडे बरावे. कारण, मफिन्सना फुलण्यासाठी साच्यात थोडी जागा रिकामी ठेवावी. सर्व साचे भरुन झाल्यावर वरुन मोझिरीला चीज किसून टाकावे. वरुन थोडे शिमला मिरची, टोमॅटो, मक्याचे

आता, हे मफिन्स प्री-हिट ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर १५ ते २० मिनिटे बेक करण्यास ठेवावे. अशाप्रकारे तयार झालेले मफिन्स बेक झाल्यानंतर छान गरमागरम सर्व्ह करावेत.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares