dhokla banner

रेसिपी – पोह्यांचा ढोकळा

साहित्य – १/२ वाटी पोहे, १/२ वाटी रवा, १ वाटी मलईचे दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, १/२ लहान चमचा फ्रुट सॉल्ट, तेल, कोथिंबीर

फोडणासाठी- १ टे.स्पू. तेल, मोहरी, हळद, हिंग, जिरे, कढीपत्त्याची पाने

पाककृती –
• एका बाऊलमध्ये दही घेऊन, त्यामध्ये कपभर पाणी मिसळावे.

• आता, त्यामध्ये पोहे, रवा, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीपुरते मीठ घालून मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.

• १० ते १५ मिनिटे हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.

• या तयार पिठाचा ढोकळा उकडण्यास ठेवण्याआधी त्यात फ्रुट सॉल्ट व २ टे.स्पू. पाणी मिसळावे. पिठातून बुडबुडे येऊ लागले की मिश्रण ढवळून घ्यावे.

• आता एका पसरट भांड्याला ओतून तेल लावावे व त्यावर हे तयार मिश्रण ओतावे.

• इडलीपात्रात ढोकळा उकडण्यास ठेवावा व साधारण १० ते १५ मिनिटांनी ढोकळा तयार झाल्याची खात्री करुन घ्यावी.

• आता, फोडणी तयार करुन घ्यावी व ढोकळ्यावर पसरावी. सोबत चिरलेली कोथिंबीर वापरुन ढोकळा गार्निश करुन घ्यावा.

मैत्रिणीनो, झटपट होणारा पोह्यांचा ढोकळा नक्की करुन पाहा व रेसिपी कशी वाटली तेही कळवा, खालील कमेन्टबॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरु नका!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares