pat pat (1)

रेसिपी – फराळी पॅटिस

प्रत्येकजण आपापल्या सवयीनुसार काही पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणे पसंत करतात, तर काही ते टाळतात. मात्र साबुदाणा, बटाटा, रताळे, राजगिरा अशा जिन्नसांपासून तयार केलेले पदार्थ मुख्यत्वे उपवासाला खाल्ले जातात. त्यात, कोथिंबीर किंवा पनीरचा समावेश करत असाल तर पुढील रेसिपी उपवासाच्या दिवशी बिनधास्त करता येईल. नाहितर इतर दिवशी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफीन बॉक्ससाठी करता येईल.

साहित्य– ४ उकडलेले बटाटे, १/४ किलो पनीर, १/२ चमचा आले पेस्ट, ३ ते ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ वाटी कोथिंबीर, १ लिंबू, राजगि-याचे पीठ, तेल, मीठ.

सारणासाठी भिजवलेल्या बदामाचे बारीक काप, मनुका, दाण्याचा कुट.

पाककृती– प्रथम उकाडलेले बटाटे व पनीर एकत्र कुस्ककरुन घ्यावे. आता, त्यामध्ये अर्धा चमचा आल्याची पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, लिंबांचा रस व मीठ मिसळावे. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करुन घ्यावेत. अशाप्रकारे तयार झालेल्या पॅटिसच्या आवरणाचे लहान लहान गोळे तयार करावेत.

त्यापैकी एक गोळा हातावर घेऊन त्याला बोटांनीच थोडे खोलगट बनवून आत सारण भरण्यासाठी जागा करावी.

आता, त्यावर बदामाचे काप, मनुका व दाण्याचा कुट ठेवून वरील आवरण त्यावर सर्व बाजूंनी आवळून घ्यावे.

असे, पॅटिस करुन घेतल्यावर ते राजगि-याच्या पिठात बुडवावेत आणि फ्राय पॅनवर थोड्या तेलात, मंद आचेवर दोन्ही बाजूंनी छान लालसर होईस्तोवर परतून घ्यावेत.

अशाप्रकारे, तयार झालेले गरमागरम कुरकुरीत व खमंगसे फराळी पॅटिस उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.

मैत्रिणींनो, तुमच्याजवळ अशा काही चविष्ट रेसिपीज असतील, तर जरुर शेअर खालील comment box मध्ये. त्या रेसिपीज आम्ही तुमच्या नावासहित शेअर करु झी मराठी जागृतीच्या इतर मैत्रिणींसोबत!

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares