bengali sweet sandesh banner

रेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’

घरच्या सुरगणी हल्ली नोकरी, व्यवसायात व्यस्त असल्या, तरी अजूनही वेळातवेळ काढून बहुतांश जणी सणासुदीचे जेवणही स्वत: बनवणे पसंत करतात. विकतच्या जेवणापेक्षा घरच्या स्वच्छतेवरच तिचा प्रचंड विश्वास असतो. म्हणूनच, किचनमध्ये नवनवे प्रयोग करणा-या झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी आजची ‘संदेश’ रेसिपी!

साहित्य –

१ लि. दूध, २ लिंबू, ४ ते ५ वेलच्या, ५० ग्रॅ. पिठी साखर, २० ते २१ केशराचे धागे, १० ते १२ पिस्ते

पाककृती –

प्रथम दूध आटवत ठेवावे. लिंबाच्या रसात थोडे पाणी घालावे. दूधाला उकळी आल्यावर, दूध गॅसवरुन उतरवावे व जरा कोमट होऊ द्यावे.

आता त्यामध्ये, थोडा थोडा लिंबाचा रस घालून मिश्रण ढवळत रहावे. पनीर व पाणी वेगळे झालेले दिसले, की लिंबाचा रस घालणे बंद करावे.

हे पनीर कापडात गुंडाळून ठेवावे व वरुन थंड पाणी घालावे. यामुळे लिंबाच स्वाद नाहिसा होईल. बांधलेले पनीर कापडामध्येच नीट दाबून घ्यावे, असे केल्याने त्यातील जास्तीचे पाणी निथळून जाईल.

तयार झालेले पनीर साधारण ५ ते ६ मिनिटे उकळू द्यावे. पनीरमध्ये पिठीसाखर व केशर मिसळावे. मंद आचेवर पनीर ५ मिनिटे परतत रहावे. आता हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर घालावी व मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.

तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन त्यांना थोडा पसरट आकार द्यावा आणि वर पिस्त्याचे काप ठेवून सजवावेत.

अशाप्रकारे, तयार झालेली ‘संदेश’ मिठाई बनवताना आवडीनुसार आणखी निराळे स्वाद करुन पाहाता येतील, तसेच इसेन्स वापरुन आकर्षक रंगातील ‘संदेश’ बनवणेही शक्य आहे.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares