chakli banner

रेसिपी – बटर मुरुक्कु

साहित्य –

३ वाट्या मैदा, १ वाटी मूगडाळ(शिजवून), १ चमचा बटर, २ चमचे तीळ, १ छोटा चमचा ओवा, १ छोटा चमचा जिरे, १/२ चमचा हिंग, १ चमचा लालतिखट, १/२ चमचा हळद, मीठ.

पाककृती –

  • मैद्याची सुती कापडामध्ये पुरचुंडी बांधावी.
  • आता, ही पुरचुंडी एका डब्यात घालून डब्याला घट्ट झाकण लावावे.
  • कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून हा मैदा वाफवून घ्यावा.
  • आता, वाफवून घेतलेल्या मैद्यात बटर, जिरे, ओवा, लालतिखट, शिजवलेली मूगडाळ व मीठ असे जिन्नस घालून मिश्रण एकजीव करावे.
  • मैदा मळून घ्यावा व पीठ कणकेसारखे मऊ करावे व १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे.
  • आता, मिश्रणाच्या चकल्या पाडून घ्याव्यात व तेल कडकडूत तापले की खरपूस तळून घ्याव्यात.

अशाप्रकारे, झटपट तयार होणा-या बटर मुरुक्कु नक्की करुन पाहा आणि हा दाक्षिणात्य पदार्थ कसा झाला तेही कळवा!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares