rasam banner

रेसिपी – मिरीयुक्त रस्सम

साहित्य – १/४ टि. हिंग, २ लहान चमचे हळद, १ टॉमेटो, ३-४ लसूण पाकळ्या, २ टि. चिंचेचा कोळ, १ टि. शिजवून घेतलेले तुरीचे वरण, १ टि. तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ

रस्सम मसाला – १ टि. धणे, १/२ टि. काळीमिरी, १/२ टि. जीरे, २ ते ३ सुक्या लाल मिरच्या

पाककृती –

  • प्रथम, धणे, जीरे, मिरी व लाल मिरच्या वेगवेगळे कोरडेच भाजून घ्यावे. त्याचा रस्सम मसाला पावडर बनवून घ्यावी.
  • सर्व जिन्नस गार झाले, की मिक्सरच्या सहाय्याने त्यांची बारीक पूड करुन घ्यावी. अशाप्रकारे, रस्सम मसाला प्रथम तयार करुन घ्यावा.
  • पातेल्यात तेल गरम करुन, त्यामध्ये हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता घालून परतावे. त्यामध्ये, १ चमचा रस्सम पावडर घालावी व मंद आचेवर १५ मिनिटे मिश्रण नीट परतून घ्यावे.
  • चिरलेली कोथिंबीर व टॉमेटो मंद आचेवर टॉमेटो मऊ होईस्तोवर परतून घ्यावे. त्यामध्ये, २ कप गरम पाणी घालावे. तुरीचे वरण व चवीनुसार चिंचेचा कोळ त्यामध्ये मिसळावा. नंतर, त्यामध्ये मीठ घालून मंद आचेवर उकळी घ्यावी.
  • रस्सम पुरेसे पातळ असावे. चवीनुसार रस्सम् पावडर त्यामध्ये मिसळावी.

कुठलेही, रेडीमेड सूप पिण्यापेक्षा हे मिरीयुक्त रस्सम् आरोग्यासाठी औषधी ठरते. मुख्यत्वे, थंडीत हे रस्सम आवर्जून प्यावे. यामुळे, ऋतूबदलामुळे होणा-या त्रासावर आराम मिळतो.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares