kachori (1)

रेसिपी – मूग डाळ कचोरी

साहित्य- (सारण) १/२ कप मूग डाळ,  १/२ टे.स्पू. तूप, १/४ टि.स्पू. हळद, १/२ टि.स्पू. लालतिखट, १/२ टि.स्पू. जिरेपूड, १/२ टि.स्पू. सुंठ पावडर, १ टि.स्पू. धणेपूड, १ टि.स्पू. बडीशेपपूड, १ टि.स्पू. आमचूर पावडर, मीठ

(आवरण)- २ कप मैदा, १/२ कप पाणी,   तूप किंवा तेल, मीठ, तेल तळण्यासाठी

पाककृती – प्रथम बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तूप व चवीनुसार मीठ घालावे. पीठ मळून घ्यावे. त्यानंतर, थोडे पाणी मिसळून पुन्हा पीठ मळून घ्यावे. पीठ फार घट्ट किंवा फार मऊ देखील मळू नये. आता हे पीठ ओलसर कापडाखाली झाकून ठेवावे.

त्यांनतर, कचोरी आतील सारणाची तयारी करण्यास घ्यावी. दोन तास भिजवलेली मूगडाळ मिक्सरमध्ये हलकीशी बारीक करावी. आता, गरम पॅनमध्ये तूप घालून ते छान तापल्यावर त्यामध्ये हळद, लालतिखट, जिरेपूड, धणेपूड, बडीशेप पूड, आमचूर पावडर घालून सर्व जिन्नस छान परतून घ्यावीत. त्यानंतर, त्यामध्ये वाटलेली मूग डाळ, चवीला मीठ व थोडा हिंग घालून पुन्हा एकदा जिन्नस मंद आचेवर परतून घ्यावा.

तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावेत आणि ओलसर कपड्याखाली झाकून ठेवलेल्या मिश्रणाची हातानाचे लहान पुरी

तयार करुन त्यामध्ये सारणचा गोळी भरावी. आवरण नीट बंद करावे व हाताने हलकेच दाबावे.

अशाप्रकारे, तयार झालेल्या कचोरी गरमागरम तेलात खुसखुशीत तळून घ्यावेत व आवडत्या चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares